माजी सैनिक व माजी सैनिकांच्या विधवांच्या पाल्यांसाठी पंतप्रधान शिष्यवृत्ती; जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी कार्यालयाकडे नोंदणी आवश्यक



अकोला,दि.16(जिमाका):- जिल्ह्यातील माजी सैनिक/माजी सैनिकांच्या विधवाच्या पाल्याचे  पंतप्रधान शिष्यवृत्ती प्रकरण सादर करण्यापुर्वी  माजी सैनिक/माजी सैनिकांच्या  विधवांनी  www.ksb.gov.in  या संकेतस्थळावर स्वत:चे रजिस्ट्रेशन Online करणे जरूर आहे. त्या करीता  स्वत:चा  E-Mail आय डी,  सैन्य सेवेतील पुर्ण माहिती  तसेच आधार कार्ड ची  पुर्ण माहिती भरून आपली नोंदणी  करणे गरजेचे आहे.  नोंदणी  केल्यांनतरच  आपले पंतप्रधान शिष्यवृत्तीचे  प्रकरण केंद्रीय  सैनिक बोर्ड, नवी दिल्ली यांच्या कडे दिनांक  15 नोव्हेंबर 2019 पुर्वी  कार्यवाही करीता सादर  करण्यात येईल.  पंतप्रधान  शिष्यवृत्तीचे  प्रकरण या   कार्यालयात  सादर करण्यापुर्वी  मुलां/मुलींचे नांवे व स्वत:चे पंजाब नॅशनल बँक किंवा  स्टेट बँक  ऑफ इंडिया  मध्ये  बचत खाते उघडावे.  पंतप्रधान शिष्यवृत्ती खालील कोर्सेस /डिप्लोमा करीता  लागु आहे. (बारावी पास 60% गुण आवश्यक) मुलांकरीता – 30,000/-  आणि मुलींकरीता – 36,000/- वार्षिक.
B.Arch,BE,B.TECH , B.Sc (Agri/Forestry) BDS,  MBBS,B.ED,BBA,BCA, B.PHARMA   ETC .असे  एकुण 102 कोर्सेस   करीता लागु आहे. तसेच अधिक  माहितीकरीता जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, अकोला यांच्याशी संपर्क साधावा. असे आर.ओ. लठाड (प्रभारी) जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, अकोला हे कळवितात. 
0000000

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ