जनता तक्रार निवारण दिन; 228 अर्ज प्राप्त


 अकोला,दि.१९(जिमाका)-  दर महिन्याच्या पहिल्या व तिसऱ्या सोमवारी होणारा जनता तक्रार निवारण दिन आज राज्याचे गृह(शहरे), विधी व न्यायविभाग, संसदीय कार्य, माजी सैनिकांचे कल्याण, कौशल्य विकास आणि उद्योजकता विभागांचे राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. रणजीत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आला. आजच्या जनता दरबारात पालकमंत्री महोदयांनी विविध विभागांच्या  एकूण 228 तक्रारींबाबतची निवेदने स्विकारली. यावेळी जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद,पोलीस अधिक्षक अमोघ गावकर, मनपा आयुक्त संजय कापडणीस तसेच विविध विभागांचे विभागप्रमुख उपस्थित होते.
आज प्राप्त विभागनिहाय तक्रारींची संख्या याप्रमाणे- 
महसूल विभाग 73, पोलीस विभाग 17, जिल्हा परिषद 53,. जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था 9, मनपा 31, जिल्हा अग्रणी बॅंक 5, विज वितरण कंपनी 5, जिल्हा अधिक्षक भूमि अभिलेख 6, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी 5 , सार्वजनिक बांधकाम विभाग-5, राज्य परिवहन महामंडळ, सहा. आयुक्त कामगार कल्याण,  जिल्हा विपणण अधिकारी,  मुख्यमंत्री ग्रामसडक योजना प्रत्येकी दोन व जिल्हा शल्य चिकित्सक, अधिष्ठाता शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, पाटबंधारे विभाग, आयटीआय, टपाल विभाग, राष्ट्रीय महामार्ग विभाग,  महाराष्ट्र जीवन प्राधिकरण,  सहाय्यक आयुक्त समाजकल्याण,  सहाय्यक संचालक नगररचना प्रत्येकी एक असे एकूण 228 तक्रारी अर्ज प्राप्त झाले.  संबंधित विभागांनी या तक्रारी अर्जांवर काम करुन येत्या 15 दिवसांत अनुपालन करावे, असे निर्देश पालकमंत्री डॉ. पाटील यांनी यावेळी संबंधितांना दिले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ