‘शिष्यवृत्ती’साठी ‘महाडीबीटी’ पोर्टलवर अर्ज करण्याचे आवाहन


 अकोला,दि.१९(जिमाका)-  चालू शैक्षणिक सत्रापासून सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत तसेच  इतर मागासवर्ग सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्ग विमुक्त जाती, भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्ग कल्याण विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध शिष्यवृत्तीसाठी महाडीबीटी या ऑनलाईन पोर्टलवर  अर्ज करावेत, असे आवाहन  सहाय्यक समाजकल्याण आयुक्त  अमोल यावलीकर यांनी केले आहे.
सन २०१९-२० या शैक्षणिक वर्षासाठी  या पोर्टलवर अर्ज करण्याची मुदत ही १० ऑक्टोबर  पर्यंत देण्यात आली असून तशी सुविधा पोर्टलवर देण्यात आली आहे. विद्यार्थ्यांनी या सुविधेचा लाभ घ्यावा व आपले अर्ज पोर्टलवर भरुन  आपापल्या महाविद्यालयाकडे अर्ज सादर करावे. महाविद्यालयांनी या प्रक्रियेसाठी विद्यार्थ्यांना सुविधा व मार्गदर्शन उपलब्ध करुन द्यावे,असे आवाहन सहाय्यक आयुक्त समाज कल्याण अमोल यावलीकर यांनी केले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ