जिल्हा तात्काळ प्रतिसाद केंद्राचे ना.धोत्रे यांच्या हस्ते लोकार्पण संपन्न




        अकोला,दि.24(जिमाका)- राष्ट्रीय बाल आरोग्य अभियानाअंतर्गत येथील जिल्हा स्त्री रुग्णालयात जिल्हा तात्काळ प्रतिसाद केंद्राचे (District Early Intervention Centre) लोकार्पण केंद्रीय  मानव संसाधन, दूरसंचार, माहिती तंत्रज्ञान राज्यमंत्री  ना.संजय धोत्रे यांच्या हस्ते झाले.
या कार्यक्रमास महापौर विजय अग्रवाल, आमदार गोपीकिसन बाजोरिया,आमदार रणधीर सावरकर, जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद,जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुरेश आसोले, जिल्हा  स्त्री रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिक्षीका डॉ. आरती कुलवाल ,अतिरिक्त आरोग्य अधिकारी डॉ. विजय जाधव,डॉ. पवनिकर,विस्तार माध्यम अधिकारी प्रकाश गवली तसेच आरोग्य विभागाचे  अधिकारी उपस्थित होते . बालवयात झालेल्या कोणत्याही आजाराचे निराकरण वेळीच झाल्यास आजार बरा होण्यास  वेळ लागत नाही.   जिल्हा तात्काळ प्रतिसाद केंद्रात शून्य ते 18 वर्षे वयोगटातील बालकांचे  विविध आजारांचे निदान  उपचार विविध तज्ज्ञांमार्फत  करण्याची सुविधा आहे. त्यामुळे लहान वयातच आजाराचे निदान होऊन लवकर उपचार करणे शक्य होईल.आणि बालकांमधील विविध आजार व विकृतींबाबत या केंद्रावर मार्गदर्शन व उपचार सुविधा उपलब्ध होणार आहे. या सुविधांचा लाभ घ्यावा असे आवाहन ना. धोत्रे यांनी केले.
जिल्हा  स्त्री रूग्णालयाच्या  वैद्यकीय अधिक्षीका डॉ. कुलवाल यांनी  रूग्णालयातील सुविधा बाबत तसेच जिल्हा तात्काळ प्रतिसाद केंद्रातील सुविधाबाबत माहिती दिली. या जिल्हा तात्काळ प्रतिसाद केंद्रात लहान मुलांसाठी प्ले एरिया , स्पीच थेरेपी रूम, सेन्सोरी इंटेग्रेशन रूम,व्हिजन असेसमेंट रूम, हिअरींग असेसमेंट रूम , डेंन्टल ओपीडी आदी कक्षांची स्थापना करण्यात आली आहे.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व उपस्थितांचे आभार मेघना बगडीया यांनी मानले. ना.संजय धोत्रे यांनी गोकुल अष्टमी निमित्याने  लहान मुलासोबत दहिहांडी फोडण्याचा आनंद घेतला. या कार्यक्रमाला आरोग्य अधिकारी , कर्मचारी, रुग्णांचे नातेवाईक व लहान मुले उपस्थित होते. 
यापुर्वी केंद्रीय राज्यमंत्री ना.  संजय धोत्रे यांच्या हस्ते जिल्हा परिषद येथे  स्वच्छता महोत्सव रथयात्रेस हिरवी झेंडी दाखवून रवाना करण्यात आले. यावेळी आमदार गोपीकिशन बाजोरिया, जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांची प्रमुख उपस्थिती होती
०००००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ