अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी मानधन योजना: किसान मानधन योजनेचा लाभ घ्यावा-जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर


         अकोला, दि.२०: जिल्ह्यातील पात्र शेतकरी बांधवांनी प्रधानमंत्री किसान मानधन योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी केलेआहे.
प्रधानमंत्री किसान मानधन योजना देशभरात 9 ऑगस्ट रोजी अंमलात आली. 18 ते 40 वयोगटातील 2 हेक्टरपर्यंत शेती असलेले सर्व अल्पभूधारक व सीमांत शेतकरी या योजनेचा लाभ घेण्यास पात्र आहेत. पात्र लाभार्थ्यांना वयाची 60 वर्षे पूर्ण झाल्यानंतर तीन हजार रूपये प्रतिमाह निवृत्तीवेतन मिळणार आहे. लाभार्थ्याचा मृत्यू झाल्यास कुटुंबियांनाही कुटुंब निवृत्तीवेतन मिळणार आहे.
लाभार्थ्यांची नोंदणी सुरु करण्यात आली आहे. ही योजना केंद्र शासनाची महत्वाकांक्षी योजना असून, अधिकाधिक पात्र लाभार्थ्यांची नोंदणी करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.आपले सरकार सेवा केंद्रात लाभार्थी नोंदणी करता येईल. नोंदणी करताना कोणतीही रक्कम भरण्याची आवश्यकता नाही. नोंदणीनंतर लाभार्थ्यांची बँक खात्यातून लाभार्थी हिश्श्याची रक्कम ऑटो डेबिटने विमा कंपनीकडे जमा होईल. प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेत लाभ घेतलेले लाभार्थी या योजनेत पात्र आहेत. त्याची यादी तालुकास्तरावर उपलब्ध आहे.गाव पातळीवर ग्रामसेवक, तलाठी, कृषी सहायक यांनी पात्र शेतक-यांना माहिती देऊन व्यापक प्रचारावर प्रचार व प्रसार करावा व अधिकाधिक पात्र व्यक्तींना नोंदणीसाठी प्रवृत्त करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी श्री. पापळकर यांनी दिले आहेत. गावनिहाय लाभार्थी नोंदणीची शिबिरे आयोजित करून लाभार्थ्यांनी निवृत्तीवेतन कार्ड वाटपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात यावा, असेही निर्देश देण्यात आले आहेत. 
नोंदणीकरीता आवश्यक कागदपत्रेः-१)आधार,२)बँक पासबुक,३)मोबाईल क्रमांक,४) गाव नमुना 8-अ.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ