अंत्योदय योजनेतंर्गत शिधापत्रिका वितरण




            अकोला, दि.8 (जिमाका)- पंडीत दीनदयाल उपाध्याय अंत्योदय योजनेतंर्गत आज जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांचे  हस्ते आत्महत्याग्रस्त शेतकरी यांच्या विधवा पत्नी, दुर्धर  आजार, आदिवासी व सामाजिक आधार नसलेल्या  अशा 2 कुटूंबाना  नियोजन भवनात शिधापत्रीकांचे वितरण  अंत्योदय  शिधापत्रिकेचे वितरण करण्यात आले.
            यावेळी जिल्हा पुरवठा अधिकारी बबनराव काळे, पुरवठा निरिक्षक अमोल पळसपगार, निलेश कळस्कार , पुरवठा  लिपिक वैभव  जोहरे, तसेच रास्त धान्य  दुकानदार रविंद्र  देशमुख , पि.बि. मुळे यांची  उपस्थिती होती.
            पंडीत दिनदयाल उपाध्याय अंत्योदय अभियांनातंर्गत  एकुण 29 हजार 538 अर्ज प्राप्त झाले आहे.यापैकी 8372 अर्जाची पडताळणी  करण्यात आली असुन 2452 अर्ज ऑनलाईन करण्यात आले आहेत. 5920 अर्जाची डाटा एन्ट्री करणे बाकी असल्याचे माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी यांनी दिली.
00000

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ