शेतकरी/शेतमजूर यांच्या साठी आज (दि.29) प्रत्येक तालुक्यात मार्गदर्शन कार्यशाळा


        अकोला,दि.28(जिमाका)-  पिकांवर किटकनाशक फवारणी करतांना काय काळजी घ्यावी याबाबत शेतकरी/शेतमजुरांसाठी प्रत्येक तालुक्यात गुरुवार दि. 29 रोजी सकाळी 11 वाजता एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.
या कार्यशाळेत रोगांच्या  प्रादुर्भावानुसार कोणकोणती शिफारस केलेली औषध, एकत्र मिळावेत, औषधांचे मिश्रण  तयार करतांना  व त्याचा वापर  किती वेळात करावा? याबाबत  कृषि विद्यापिठातील तज्ज्ञ मार्गदर्शन करणार आहेत. या कार्यशाळांचे ठिकाण व मार्गदर्शक तालुकानिहाय याप्रमाणे-  अकोला येथे एमआयडीसी हॉल, अप्पु पुतळा चौक, अकोला- डॉ. सोनाळकर, बाळापूर तालुका निंबा फाटा, येथे डॉ. सुरज सातपुते-9657725859,  अकोट तालुका- पंचायत समिती हॉल, अकोट, डॉ. उपेंद्र कुलकर्णी-9881966496, तेल्हारा तालुका श्रीकृष्ण मंदिर, नगरपरिषद हॉल, डॉ. लांडे-7588962199, मुर्तिजापूर तालुका- कृषि उत्पन्न बाजार समिती सभागृह, मुर्तिजापूर, डॉ. प्रशांत माने-9922881245, बार्शी टाकळी तालुका- पंचायत समिती हॉल, डॉ. भलकारे, पातुर तालुका- पंचायत समिती सभागृह, पातुर डॉ. अजय सदावर्ते 9657725697. जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकरी शेतमजूरांनी या कार्यशाळेचा लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि  अधिकारी मोहन वाघ यांनी केले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ