गणेशोत्सव मंडळांना सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालयाची परवानगी अनिवार्य


अकोला,दि.28(जिमाका)- सार्वजनिक न्यासा व्यतिरीक्त गणेशोत्स साजरा करणाऱ्या सर्व मंडळांना महाराष्ट्र सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था अधिनियम 1950 चे कलम 41- क अन्वये विहीत नमुन्यात संकेतस्थळावर किंवा प्रत्यक्षरित्या संबधीत सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालयात परवानगीसाठी अर्ज करणे अनिवार्य आहे. हा अर्ज सर्व मंडळाना charity.maharashtra.gov.in  या संकेतस्थळावर सादर करता येईल.संकेतस्थळावर केलेल्या अर्जाचा निपटारा महाराष्ट्र सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था अधिनियमातील कलम 41 क उपकलम 2 अन्वये सात दिवसात करण्यात येईल. प्रत्यक्ष सादर केलेला अर्ज प्राप्त झाल्यानंतर 15 दिवसाच्या आत निकाली काढण्यात येईल. या तरतुदीअंतर्गत देण्यात येणारे दाखले सहा महिन्यांकरीता वैध असतील, या कालावधीनंतर असे दाखले नुतनीकरण करण्यास ग्राह्य नसतील. सर्व गणेशोत्स मंडळाना दाखला प्राप्त झाल्यापासुन त्या कालावधीनंतर 2 महिन्यांच्या आत लेखा परिक्षण अहवाल सादर करणे व उर्वरित रक्कम जमा करणे अनिवार्य आहे. गणेशोत्सव मंडळाने तरतुदीप्रमाणे परवानगी न घेतल्यास , महाराष्ट्र सार्वजनिक विश्व़स्त़ व्यवस्था अधिनियम,1950 चे कलम 66 -C प्रमाणे 3 महिन्यापर्यंत कैद किंवा परवानगी प्राप्त करण्यापुर्वी गोळा केलेल्या एकूण वर्गणीच्या दीडपट रकमेपर्यंत दंडाची तरतुद केली आहे.तरी सर्व मंडळांनी कायद्याच्या तरतुदींचे पालन करावे, असे आवाहन धर्मदाय उपायुक्त अकोला यांनी केले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ