शेतकरी कंपन्यांची आज (दि.2) कार्यशाळा
अकोला,दि. 1 (जिमाका)- येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठ व कृषि विभाग
यांच्या वतीने अमरावती विभागातील शेतकरी
उत्पादक कंपन्याचे एक दिवसीय कार्यशाळा
शुक्रवार दि. 2 रोजी सकाळी 11 वाजता आयोजीत
करण्यात आली आहे. या कार्यशाळेचे
उद्घाटन राज्याचे कृषिमंत्री तथा डॉ.
पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठाचे प्रति
कुलपती ना.डॉ. अनिल बोंडे यांच्या हस्ते होणार आहे.
या कार्यशाळेचे आयोजन डॉ. पंजाबराव देशमुख कृषि
विद्यापीठ अकोला येथील दीक्षांत सभागृहात करण्यात आले आहे. या कार्यशाळेसाठी डॉ.
पंजाबराव देशमुख जैविक शेती मिशनचे
अध्यक्ष प्रकाश पोहरे प्रमुख अतिथी म्हणून तर कुलगुरू डॉ. विलास भाले हे कार्यवाहक
म्हणून उपस्थित राहणार आहेत. यावेळी कार्यकारी परिषद सदस्य आ.
गोपीकिशन बाजोरीया , आ. श्रीकांत देशपांडे, आ. रणधीर सावरकर, आ. अमित सनक, जैनुद्दीन जव्हेरी, गणेश कंडारकर, स्नेहा हरडे,
विनायक सरनाईक , मोरेश्वर वानखेडे, डॉ. पी.जी. पाटील, आदी मान्यवरांची विशेष
उपस्थिती राहणार आहे.
या कार्यालयास
उपस्थितीचे आवाहन संचालक विस्तार शिक्षण डॉ. दिलीप मानकर, संचालक संशोधन डॉ. विलास खर्चे कृषि सहसंचालक
सुभाष नागरे यांनी केले आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा