सन्मान कष्टाचा, आनंद उद्याचा: इमारत बांधकाम कामगारांना आज (दि.14) कामगार मंत्र्यांच्या हस्ते सुरक्षा संच वाटप


                        अकोला,दि.13(जिमाका)-  शासनाच्या इमारत व इतर बांधकाम कामगार  कल्याणकारी मंडळाच्या वतीने जिल्ह्यातील नोंदणी झालेल्या बांधकाम कामगारांना सुरक्षा  संच, व अत्यावश्यक संच  व इतर विविध योजनांचे  लाभ वाटप बुधवार दि.14 रोजी राज्याचे कामगार ,इतर मागासवर्ग, सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती आणि विशेष मागासप्रवर्ग कल्याण विभागाचे मंत्री डॉ. संजय कुटे यांचे हस्ते होणार आहे. सन्मान कष्टाचा आनंद उद्याचा या ब्रीद वाक्यानुसार हा कार्यक्रम होत आहे.
            येथील एमआयडीसी मेन रोड, एमआयडीसी फेज-4, गिरीराज स्टिलच्या समोर शिवणी अकोला येथे दुपारी तीन वाजता हा कार्यक्रम होणार आहे.या कार्यक्रमाच्या  अध्यक्षस्थानी केंद्रीय मनुष्यबळ विकास, दळणवळण आणि इलेक्ट्रानिक्स, माहिती आणि तंत्रज्ञान विभागाचे राज्यमंत्री ना. संजय शामराव धोत्रे हे राहतील. या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून राज्याचे गृह (शहरे), विधी  व न्याय ,संसदीय कार्य, माजी सैनिक कल्याण , कौशल्य विकास  आणि उद्योजकता राज्यमंत्री तथा पालकमंत्री ना.डॉ.रणजीत पाटील, महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाचे अध्यक्ष ओमप्रकाश (मुन्ना ) यादव, राज्य शिक्षण हक्क परिषदेचे उपाध्यक्ष आ. श्रीकांत देशपांडे यांची  उपस्थिती राहील. यावेळी महापौर विजय अग्रवाल, आ.गोपीकीशन बाजोरीया, आ. गोवर्धन शर्मा, आ. प्रकाश भारसाकळे, आ. हरिष  पिंपळे,आ. बळीराम सिरस्कार, आ. रणधीर सावरकर तसेच उद्योग, उर्जा व कामगार विभागाचे प्रधान सचिव राजेश कुमार, विभागीय आयुक्त पियुष सिंग, कामगार आयुक्त डॉ. महेंद्र कल्याणकर,जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, पोलीस अधीक्षक अमोघ गांवकर, म.न.पा. आयुक्त संजय कापडणीस  यांची विशेष उपस्थिती राहणार आहे.
कामगारांना दिला जाणारा लाभ
सदरच्या वाटप कार्यक्रमात कामगार मंडळात नोंदणीकृत असणाऱ्या बांधकाम कामगारांना किट वाटप तसेच अवजारे खरेदी अनुदान, 2 पाल्यांच्या शिष्यवृत्तीचे अनुदान, विवाह अनुदान, प्रसूती अनुदान व इतर अशा 29 योजनांचा लाभ वाटप कार्यक्रम येथे होणार आहे. बांधकाम कामगारांना मंडळात नोंदणी करुन लाभ व साहित्यांचा समावेश असणाऱ्या अत्यावश्यक संच व सुरक्षा संच प्राप्त करुन घेता येऊ शकते. यासाठी नोंदणीकृत होणे आवश्यक असल्याने बांधकाम कामगाराने नोंदणी करण्यासाठी तत्सम कागदपत्रांची पुर्तता करुन शुल्क रु.85/- (पाच वर्षाकरिता) भरुन पावती व ओळखपत्र प्राप्त करावे. बांधकाम कामगारांसाठी महाराष्ट इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ व कामगार विभाग(म.रा) यांचे वतीने एकुण 29 योजना जाहिर करण्यात आल्या असुन अटल सन्मान योजनेंतर्गत या योजना देण्यात येत आहेत. यात किट, अवजारे खरेदीसाठी रु.5,000/- अनुदान, विवाह अनुदान रु.30,000/-, दोन अपत्यांच्या प्रसुतीसाठी नैसर्गिक प्रसुती रु.15,000/- शस्त्रक्रियेद्वारे प्रसुती रु.20,000/- रु.आर्थिक सहाय्य देण्यात येते.

याशिवाय नोंदीत कामगारांचे किंवा त्याचे पतीने 1 मुलीनंतर कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया केल्यास मुलीच्या नावे 18 वर्षासाठी 1 लाख रु.मुदत बंद ठेव योजना, आरोग्य तपासणी, नोंदीत कामगाराचा कामावर असतांना अपघाती मृत्यू झाल्यास त्याच्या वारसास 5 लाख रु. आर्थिक सहाय्य, अंत्यविधीकरिता 10 हजार रु.सहाय्य, घरखरेदी व घरबांधणीसाठी बॅकेकडुन घेतलेल्या 6 लाख रु.गृहकर्जावरील व्याजाची रक्कम अथवा 2 लाख रु.अर्थसहाय्य पंतप्रधान आवास योजना, अशा नानाविध योजनेद्वारे बांधकाम कामगारांना आर्थिक सहाय्य देण्यात येते.
            या कार्यक्रमाला उपस्थित राहून विविध योजनांचा लाभ घ्यावा असे आवाहन   इमारत व इतर बांधकाम कामगार  कल्याणकारी मंडळाचे सचिव श्री.चु. श्रीरंगम, अपर कामगार आयुक्त  वि.रा. पानबुडे, आणि सहाय्यक कामगार आयुक्त राजू गुल्हाने  यांनी केले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ