बांधकाम कामगार नोंदणीसाठी शिबिर:अकोला तालुक्यासाठी २७ ते २९ दरम्यान आयोजन



अकोला,दि.२१(जिमाका)- अटल विश्वकर्मा सन्मान योजनेअंतर्गत शासनाने महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याण मंडळ, मुंबई अंतर्गत अनोंदित बांधकाम कामगारांची नोंदणी, नुतणीकरण, लाभ वाटप इ. करीता जिल्ह्यात विशेष नोंदणी अभियानास शनिवार दि. 31 पर्यंत मुदत वाढ दिली आहे.  या कालावधीत पातुर, बार्शिटाकळी, बाळापुर, तेल्हारा, अकोट व मुर्तीजापुर या तालूक्यातील कामगारांची नोंदणी करण्यात आली आहे.  अकोला शहरातील पुर्व झोन मध्ये सुध्दा नोंदणी शिबिर घेण्यात आले आहे. दि. 27 ते  दि. 29 या दरम्यान फक्त अकोला तालुक्याकरीता नोंदणी शिबिर होणार आहेत, तरी कामगारांनी प्रत्यक्ष सहाय्यक कामगार आयुक्त यांचे कार्यालय, अकोला येथे येवून नोंदणी करावी, असे आवाहन सहाय्यक कामगार आयुक्त आर. डी. गुल्हाने यांनी केले आहे. नोंदणी करीता नोंदणी फी पंचवीस रुपये व अशंदान फी  एक रुपया प्रती मा प्रमाणे 5 वर्षा करीता एकुण  साठ रुपये याप्रमाणे आहे. असे एकूण 85रुपये इतके शुल्क  भरुन पावती देण्यात येते. या व्यतीरीक्त मंडळाव्दारे  नोंदणी/ विविध योजना / सेप्टी किट/ सुरक्षा किट या करीता कोणतीही फी स्विकारण्यात येत नाही. तसेच विविध योजनांची रक्कम प्रत्यक्ष आरटीजीएस व्दारे कामगारांच्या खात्यात वर्ग करण्यात येते. तरी त्रयस्त व्यक्तीसोबत मंडळाच्या कामाकरीता कोणताही व्यवहार करू नये.
 तसेच ज्या बांधकाम कामगारांनी शिबीरामध्ये नोंदणी केली  नाही अशा कामगारांनी दि. 3 सप्टेंबर पासुन दर सोमवार व मंगळवार सकाळी 10 ते 11 या वेळेत प्रत्यक्ष कार्यालयातून नोंदणी टोकण प्राप्त करून दिलेल्या दिनांकाच्या दिवशी परीपुर्ण नोंदणी अर्ज देवून नोंदणी करावी,असे आवाहन सहाय्यक कामगार आयुक्त आर.डी.गुल्हाने यांनी केले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ