स्वातंत्र्यदिन सोहळा उत्साहात; जिल्ह्याच्या सर्वांगिण प्रगतीसाठी अविरत प्रयत्न- पालकमंत्री ना.डॉ. रणजित पाटील



अकोला,दि.१५(जिमाका):- जिल्ह्याचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी आरोग्य, शिक्षण, संरक्षण तसेच मुलभूत सोई-सुविधांच्या निर्मितीसाठी अविरत प्रयत्न सुरु आहेत. त्याचे इष्ट परिणाम दिसत असून जिल्हा विकासाच्या मार्गावर वाटचाल करीत आहे, असे प्रतिपादन राज्याचे गृह(शहरे), विधी व न्यायविभाग, संसदीय कार्य, माजी सैनिकांचे कल्याण, कौशल्य विकास आणि उद्योजकता विभागांचे राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ.रणजित पाटील  यांनी आज स्वातंत्र्य दिन सोहळ्यात बोलतांना केले.
येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात स्वातंत्र्यदिनाचा ७२ वा वर्धापन दिन सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा पोलीस अधिक्षक अमोघ गावकर, मनपा आयुक्त संजय कापडणीस, अपर जिल्हाधिकारी नरेंद्र लोणकर, निवासी उपजिल्हाधिकारी राम लथाड, निवडणूक उपजिल्हाधिकारी  राजेश खवले  आदी उपस्थित होते.
कार्यक्रमात सुरुवातीला ध्वजारोहण व ध्वजवंदन करण्यात आले. पोलीस वाद्यवृंदाच्या तालावर राष्ट्रगीताची धुन वाजवून राष्ट्रगीत सादर करण्यात आले. त्यानंतर पालकमंत्र्यांनी उपस्थितांशी संवाद साधला.
यावेळी स्वातंत्र्य प्राप्तीसाठी बलिदान दिलेल्या देशभक्त स्वातंत्र्यविरांच्या पवित्र स्मृतीला अभिवादन करुन डॉ.पाटील यांनी आपल्या संबोधनास प्रारंभ केला.
७२ हजार ४४६ हेक्टर संरक्षित सिंचन सुविधा निर्मिती
त्यानंतर ते म्हणाले की, जिल्हा दुष्काळमुक्त करण्यासाठी जलयुक्त शिवार अंतर्गत जिल्ह्यात गेल्या चार वर्षात 613 गावात  जलसंधारणाची कामे सुरु आहेत.  जिल्ह्यात 478 गावे जलपरिपूर्ण झाली आहेत.या कामांमुळे  72 हजार 446 हेक्टर संरक्षित सिंचनाची सुविधा निर्माण झाली आहे. ३३ कोटी वृक्ष लागवड अभियानात  जिल्ह्यात आतापर्यंत ५२ लक्ष ६४ हजार वृक्ष रोपांची लागवड करण्यात आली आहे. तसेच एक विद्यार्थी एक झाड या अकोला पॅटर्न अंतर्गत  जिल्ह्यातील १ लाख ८० हजार विद्यार्थ्यांनी वृक्ष लागवड केली आहे.
सातबारा डिजीटल करण्यात अकोला राज्यात प्रथम
आपल्या जिल्ह्यात जागतिक बँकेच्या अर्थसाहाय्याने नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्प राबविण्यात येत असून त्यात ४९८ गावांची निवड करुन आतापर्यंत 376 लाभार्थींना 1 कोटी 4 लक्ष रूपयाचा लाभ थेट बॅंक खात्यात देण्यात आला आहे. प्रधानमंत्री पिक विमा योजनेतंर्गत  यावर्षी खरीप हंगामात 1 लक्ष 94 हजार  846 शेतकऱ्यांनी 90 हजार 192 हेक्टर क्षेत्र विमा संरक्षित केले आहे.मागील वर्षीच्या 38 हजार 772 विमाधारकांना पिक विमा कंपनीकडून नुकसान भरपाई शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यात जमा करण्यात आली आहे. अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाअंतर्गत छत्रपती राजाराम महाराज उद्योजकता व कौशल्य विकास अभियान अंतर्गत स्वयंरोजगारासाठी 2 कोटी 71 लाख 16 हजार 557 रुपये इतके कर्ज वाटप झालेआहे. सातबारा डिजीटल करण्याच्या प्रकल्पात अकोला जिल्ह्यात 97.55 टक्के  काम पुर्ण झाले असुन अकोला जिल्हा राज्यात प्रथम क्रमांकावर आहे. तसेच डिजीटल इंडिया भूमिअभिलेख आधुनिकीकरण कार्यक्रमांतर्गत अकोला जिल्ह्याचे अभिलेख स्कॅनिंगचे काम शंभर टक्के पूर्ण झाले आहे. आयुष्यमान भारत योजनेच्या लाभार्थ्यांना गोल्डन कार्ड वितरणात अकोला जिल्हा राज्यात अव्वल असुन जिल्ह्यात  2 लाख 01 हजार 127 लाभार्थ्यांना कार्ड वितरीत करण्यात आले आहे.
जनता तक्रार निवारण दिनामुळे दिलासा
सार्वजनिक वितरण व्यवस्थेतंर्गत व्दारपोच योजना व ए.ई.पी.डी.एस. योजनेव्दारे लाभार्थ्यांपर्यंत धान्याचे वाटप केले जात असून त्याची प्रभावीपणे अंमलबजावणी केल्यामुळे धान्‍य वितरणातील गैरप्रकाराला पूर्णपणे आळा बसला आहे.  प्रत्‍येक महिन्याच्या पहिल्या व तिसऱ्या सोमवारी सुरु करण्यात आलेल्या या उपक्रमात आतापर्यंत 6 हजार 117  तक्रारी प्राप्त झाल्या असुन त्यापैकी 5 हजार 831 तक्रारीचे निराकरण करण्यात आलेले आहे. तक्रार निवारणाचे प्रमाण 95.32 टक्के आहे. प्रशासनाच्या सकारात्मक भूमिकेमुळे अनेक तक्रारींचा निपटारा जलदगतीने  होत असुन सर्वसामान्याच्या नागरीकांच्या विविध समस्यांचे निराकरण करण्यासाठी हा उपक्रम  आशेचा किरण ठरलेला आहे.
पायाभुत सुविधा निर्मिती
जिल्ह्यात जिल्हा व सत्र न्यायालयाची नविन इमारत, अकोट येथे न्यायाधिशासाठी  चार निवासस्थाने बांधण्यास मंजुरी, अत्याधुनिक  सुपरस्पेशालिटी हॉस्पीटलचे बांधकाम,  जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रशासकीय इमारतीचे बांधकाम सात ते आठ महिन्यांत पूर्ण करण्यात येणार आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील तीन इमारतींचे काम पूर्ण झाले आहे. अकोला, तेल्हारा  व अकोट येथील तहसील कार्यालये तसेच अकोट येथील उपविभागीय कार्यालयाच्‍या इमारतीचे कामही सुरु झाले आहे. अशा विविध पायाभूत सुविधा निर्माण केल्या जात आहेत. ज्याद्वारे नागरिकांना विविध सेवांचा लाभ घेता येईल.
शहरी  भागातील सुविधांना प्राधान्य
           अकोला शहरातही पाणीपुरवठा सुविधा निर्माण करणे, सिमेंटचे रस्ते, पथदिवे, मोकळ्या जागेत हरितक्षेत्र निर्माण करणे  तसेच सौंदर्यीकरणामुळे शहराचा चेहरामोहरा बदलला आहे.  शहरात आठ ठिकाणी जलकुंभ उभारणी व सुमारे ४५० किलोमीटरची नवीन जलवाहिनी टाकण्याचे काम सुरु आहे. तसेच शिलोडा येथे मलनि:स्सारण केंद्र बांधणीचे कामही सुरु आहे. अकोला महानगरपालीका हद्दवाढ झालेल्या भागामध्ये नागरी सोयी-सुविधा करीता 100 कोटी रूपयाचा निधी मंजूर झाला आहे. 574 कामांना मंजुरी मिळाली असुन त्यापैकी 34 कामे पुर्ण झाली असुन 109 कामे प्रगती पथावर आहे. सांस्कृतिक भवनाचे काम पूर्णत्वास गेले आहे. तसेच अतिरिक्त सुविधांसाठी १५ कोटी रुपयांचा निधी प्राप्त झाला आहे. डाबकी रोड-शेगाव रेल्वे क्रॉसिंग उड्डाण पुल, न्यू तापडिया नगर येथील रेल्वे उड्डाण पुल आदी सुविधांची निर्मिती होत आहे. अकोला शहरातील नेकलेस रोडचे काम मार्गी लागले असून याठिकाणी भूमिगत वीजवाहिनी टाकण्यात येणार आहे. अकोला महानगरपालिका तसेच मुर्तिजापूर व बाळापूर नगरपरिषदेला अग्निशमन वाहन उपलब्ध करुन देण्यात आले आहे. उत्तम नागरी जीवन उपलब्ध व्हावे यासाठी शासन प्रयत्नशिल आहे.
कायदा सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी दक्ष
 जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी तसेच शांतता व सलोख्याचे वातावरण राहावे, यासाठी  शासन दक्ष आहे. पोलीस प्रशासनाच्या दक्षतेमुळे जिल्ह्यात गुन्हेगारीला आळा बसला आहे. सोशल मिडियाव्दारे भावना भडकावून जातीय तणाव निर्माण करणाऱ्या समाजकंटकांविरुध्द कायदेशीर कारवाई करता यावी, यासाठी सायबर सेलची निर्मिती करण्यात आली आहे.  अशा प्रकारे जिल्ह्यात विविध क्षेत्रात कामगिरी होत असून  त्याद्वारे जिल्हा प्रगतीपथावर वाटचाल करीत आहे, असे त्यांनी सांगितले.
उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्यांचा गुणगौरव व सत्कार
या सोहळ्यात जिल्ह्यात विविध क्षेत्रात उत्तम कामगिरी करणाऱ्यांचा पालकमंत्री ना. डॉ. पाटील यांच्या हस्ते सत्कार करुन गुणगौरव करण्यात आला. त्यांची नावे या प्रमाणे-
आदर्श तलाठी पुरस्कार- मुर्तिजापुरचे तलाठी प्रविण सुभाष टाले.
पुर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षाः- अंजिक्य नरेंद्र धर्मे-स्कुल ऑफ स्कॉलर अकोला, पुनम चंद्रशेखर सावरकर- प्रभात किड्स अकोला, ईशा निलेश कोरडे- प्रभात किड्स अकोला, संस्कृती विनायक पाठक- बालशिवाजी प्रायमरी स्कुल अकोला, 
राष्ट्रीय  प्रज्ञा शोध परीक्षा- सायली महिपाल गणवीर- स्कुल ऑफ स्कॉलर अकोला, पार्थ शैलेश  नावकार-प्रभात किड्स अकोला,  श्रीकर अतुल बंग-प्रभात किड्स अकोला, कीर्ती चंद्रशेखर सावरकर-प्रभात किड्स अकोला, अभय विनोद अवचार-प्रभात किड्स अकोला,प्रचिता प्रकाश मुकूंद-प्रभात किड्स अकोला,राधिका राजकुमार  भागडीया- नोव्हेल हायस्कुल अकोला, ईशा राजाभाऊ पार्थीकर-नोव्हेल हायस्कुल अकोला,अर्थव देवेंद्र टाले-स्कुल ऑफ स्कॉलर अकोला, तनवी संतोष गहुकार-पोद्दार स्कुल अकोला, ब्रुगीश मेहूल व्होरा-माऊंट कॉर्मेल अकोला,   पलक रमेश राठी-माऊंट कॉर्मेल अकोला, पुर्वा परिक्षीत सारडा-माऊंट कॉर्मेल अकोला, गिरीराज भास्कर वजीरे-माऊंट कॉर्मेल अकोला, उत्कर्ष श्रीराम कमल-माऊंट कॉर्मेल अकोला, रसिका दिनेशमल-कोठारी कॉन्व्हेट अकोला, प्रियांशी संजय खेतान- कोठारी कॉन्व्हेट अकोला,  खुशी गणेशकुमार गोडांने-कोठारी कॉन्व्हेट अकोला, प्राची तरूण राठी- स्कुल ऑफ स्कॉलर अकोला, रसिका ज्ञानेश्वर कपले-स्कुल ऑफ स्कॉलर अकोला, अनिकेत सुनिल इंगळे-स्कुल ऑफ स्कॉलर अकोला, श्रुती अंनत लव्हाळे-स्कुल ऑफ स्कॉलर अकोला,विराज राजु जगताप- स्कुल ऑफ स्कॉलर अकोला, तेजस प्रभाकर मोहाले- विवेकानंद इंग्लीश स्कुल अकोला, तुषार भारत कराळे-नोव्हेल स्कुल अकोला,   सुमित श्रीकृष्ण धुळे- नोव्हेल स्कुल अकोला,   रोहन दत्तात्रय कावडे- नोव्हेल स्कुल अकोला,   प्रज्वल जगन्नाथ्‍  घोगले-  छत्रपती शिवाजी हायस्कुल अकोला,   हर्षल अमर गजभिये -छत्रपती शिवाजी हायस्कुल अकोला,   पार्थ दिपक वर्मा-फ्रिडम इंग्लीश स्कुल अकोट, कमल नाजुकराव वानखडे- व्यंकटेश बालाजी इंग्लीश स्कुल अकोला.
छत्रपती शिवाजी महाराज वनश्री पुरस्कार- जयबजरंग  माध्यमिक  व उच्‍च माध्यमिक विद्यालय रूस्तमाबाद तालुका बार्शिटाकळी.
जिल्हा क्रीडा पुरस्का  जिल्हा गुणवंत खेळाडु- (महिला)  पुनम  रामनारायण कैथवास, जिल्हा गुणवंत खेळाडु (पुरूष) हरिवंश रविंद्र टावरी , जिल्हा गुणवंत खेळाडु (थेट)  कु. साक्षी उमेश गायधनी,  जिल्हा गुणवंत क्रीडा मार्गदर्शक राहुल गुलाबराव वानखडे.
जिल्हा स्मार्ट ग्रामपंचायत-अकोट तालुक्यातील  उमरा, अकोला तालुक्यातील कापशीरोड, बाळापुर तालुक्यातील रिधोरा,बार्शिटाकळी तालुक्यातील सराव, मुर्तिजापुर तालुक्यातील धानोरा वैद्य , पातुर तालुक्यातील शेखापुर , तेल्हारा तालुक्यातील  गोर्धा.
विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगीरी- भारत वृक्ष क्रांती  संस्थेचे  संस्थापक षण्मुगम नाथन,  महात्मा फुले जन आरोग्य योजनेमध्ये  उल्लेखनीय काम केल्याबद्दल विभागीय व्यवस्थापक  अनिल वाठोरे , सेंद्रीय शेती  यावरील संशोधन  करणारे कान्हेरी सरप येथील मधुकरराव सरप , थॅलेसिमीया रूग्णांच्या पुनर्वसनासाठी  व त्यांना  आरोग्य विषयक सेवा पुरविण्यासाठी हरिष अलिमचंदानी, इंडियन रेडक्रॉस सोसायटीचे मानद सचिव प्रभजित सिंग  बछेर , नगरसेविका ॲड. धनश्री निलेश देव , सुप्रसिध्द  व्यंगचित्रकार गजानन  घोंगडे, जेष्ठ नागरी संघाचे सुहास काटे,  नेत्रदान क्षेत्रामध्ये  उल्लेखनीय काम करणारे चंद्रकांत पनपालीया , कर्णबधीर मुलांसाठी  कार्य करणाऱ्या सुचिता श्रीकांत बनसोड,  आरोग्य सेवा पुरविल्याबद्दल सलिम सिध्दीकी , पर्यावरण संरक्षण व  पर्यावरण पुरक गणेश मुर्ती निर्माण करणारे  शरद कोकाटे,  गाडगेबाबा  आपत्तीकालीन पथक तसेच शोध मोहिम बचाव कार्य  मधे वेळोवेळी  सहकार्य करणारे  दीपक सदाफळे व  वन्यजीव संरक्षक  संदीप सरडे.
पशुसंवर्ध विभागातर्फे पंचायत समिती अंतर्गतआयएसओ मानांकन प्राप्त संस्था- घुसर पशु वैद्यकीय दवाखान्याचे  पशुधन विकास अधिकारी  डॉ. आर बी सावजी, निभोंराचे डॉ. जि.टी. ताथोड, कापशीचे डॉ. पीएम चेडे , बोरगावचे  डॉ. श्रीमती ए.के. देशपांडे, भौरदचे पशुधन पर्यवेक्षक आर.एफ. सैय्यद यांचा सत्कार करण्यात आला. निवडणूकीत उत्कृष्ट कामगिरी- नायबतहसिलदार  महेंद्र कुमार आत्राम, तलाठी किशोर वाघमारे, तलाठी भरत ढोरे.
तंबाखुमुक्तीची शपथ
स्वातंत्र्य दिन सोहळ्यानंतर पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी उपस्थितांना तंबाखु मुक्तीची शपथ दिली.राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमाअंतर्गत हा उपक्रम राबविण्यात आला.
डिजीटल वॉल व जि.प. च्या वेबसाईटचे उद्घाटन
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वतीने शासकीय योजनांच्या प्रचार प्रसिद्धीसाठी तयार करण्यात आलेल्या डिजीटल वॉलचे उद्घाटन पालकमंत्री डॉ. पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच जिल्हा परिषदेच्या आधुनिक व अद्यावत वेबसाईटचे विमोचन ही यावेळी करण्यात आले. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या लोकशाही सभागृहात हा कार्यक्रम पार पडला. यावेळी जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, अपर जिल्हाधिकारी नरेंद्र लोणकर आदी वरिष्ठ अधिकारी स्वातंत्र्य सैनिक, सामाजिक राजकीय कार्यकर्ते आदी यावेळी उपस्थित होते.
मत्स्यगंधा वाहनाचे वाटप
मत्स्य व्यवसाय करणाऱ्या शेतकरी गटांना जिल्हा वार्षिक योजनेतून देण्यात आलेल्या मत्स्यगंधा या वाहनाचे वितरण यावेळी पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. या वाहनांतून विविध मत्स्य व्यंजन बनवून हे मत्स्य व्यावसायिक  विक्री करु शकणार आहेत. त्यासाठी सुसज्ज अशी ही वाहने आज लाभार्थी गटांना वितरीत करण्यात आले.
स्वातंत्र्य दिन सोहळ्याचे सूत्रसंचालन उपशिक्षणाधिकारी प्रकाश अंधारे यांनी केले.
या सोहळ्याला स्वातंत्र सैनिक , राजकीय सामाजिक पदाधिकारी , शासकीय अधिकारी , कर्मचारी , पत्रकार, विद्यार्थी- विद्यार्थीनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
०००००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ