सन 2018-19 चे जिल्हा क्रीडा पुरस्कार घोषीत





अकोला,दि.13 (जिमाका)-  जिल्ह्यातील गुणवंत खेळाडू, गुणवंत क्रीडा मार्गदर्शक, गुणवंत  क्रीडा संघटक कार्यकर्ता यांच्या कार्याचे  योगदानाचे मुल्यमापन होऊन त्यांचा गौरव  व्हावा व प्रोत्साहन मिळावे म्हणुन  दरवर्षी जिल्हा क्रीडा पुरस्काराचे  वितरण करण्यात येते. त्याअनुषंगाने जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, अकोला अंतर्गत जिल्ह्यातील गुणवंत खेळाडु, गुणवंत क्रीडा  मार्गदर्शक  यांना सन 2018-19 चे पुरस्कार  घोषित करण्यात आले.  सदर पुरस्काराचे  वितरण 15 ऑगस्ट 2019 रोजी  सकाळी 9.00 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय अकोला येथे आयोजीत होणा-या स्वातंत्र्य  दिनाच्या मुख्य शासकीय कार्यक्रमात  प्रमुख अतिथींच्या हस्ते पुरस्कारार्थींना  रोख रू. 10,000/- रूपये, मानचिन्ह व प्रमाणपत्र  देवून गौरविण्यात येत आहे.
जिल्हा गुणवंत खेळाडू (महिला) हा पुरस्कार कु. पुनम रामनारायण कैथवास यांना जाहिर झालेले आहे. त्यांनी बाँक्सिंग या  खेळामध्ये राज्य, राष्ट्रीय स्तरावर खेळाडू म्हणून  उत्कृष्ठ कामगीरी केल्याबद्दल त्यांना हा पुरस्कार जाहिर  केलेला आहे.
जिल्हा गुणवंत खेळाडू (पुरूष)  हा पुरस्कार  हरिवंश रविंद्र टावरी यांना जाहिर झालेले आहे. त्यांनी बाँक्सींग या खेळामध्ये आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय स्तरावर खेळाडू म्हणून  उत्कृष्ठ कामगीरी केल्याबद्दल त्यांना  हा पुरस्कार  जाहिर केलेला आहे.
जिल्हा गुणवंत खेळाडू (थेट पुरस्कार) हा पुरस्कार कु. साक्षी उमेश गायधनी यांना जाहिर झालेले आहे. त्यांनी बॉक्सींग  या खेळामध्ये राज्य , राष्ट्रीय  व जिल्हास्तरावर खेळाडू निर्माण  केल्याबाबत त्यांना  जाहिर केलेला आहे, असे जिल्हा क्रीडा अधिकारी अकोला यांनी कळविले आहे.
00000000

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ