जनसत्याग्रह संघटनेतर्फे पूरग्रस्तांसाठी मदत रवाना



            अकोला,दि.27(जिमाका)- सांगली, कोल्हापूर येथील पुरग्रस्तांना  स्थानिक जनसत्याग्रह संघटनेतर्फे जमा करण्यात आलेली मदत वाहनाद्वारे आज जिल्हाधिकारी डॉ.जितेंद्र पापळकर यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून रवाना करण्यात आली.
जनसत्याग्रह संघटनेने दि. 17 पासुन  जिल्ह्यातील  विविध भागात आवाहन करुन मदत गोळा केली होती. ही जमा झालेली मदत आज जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्या हस्ते  मदत वाहनाला हिरवी झेंडी दाखवून सांगली, कोल्हापूर कडे रवाना केली. यावेळी जनसत्याग्रह संघटनेचे अध्यक्ष आसिफ अहमद खान,प्रभजितसिंघ बच्छेर, शेख आज़म,अमिन उर रहमान,इरफान खान,तौसीफ अहमद मोंटू,हैदर शाह,अंजार अहमद खान,मोहम्मद शाह,सै, ज़ाहिर,शेख जमील कुरेशी,शेख साबिर,सै शाहिद, शेख असलम,आदि पदाधिकारी उपस्थित होते.
00000

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

विधानसभा निवडणूक 2024 - पूर्वपिठीका

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

विधानसभा निवडणूकीसाठी 70 उमेदवारांचे अर्ज कायम