स्वातंत्र्यदिनाचा मुख्य शासकीय सोहळा जिल्हाधिकारी कार्यालय आवारात



                      अकोला, दि.8 (जिमाका)-  भारतीय स्वातंत्र्य दिनाचा 72 वा वर्धापन दिन येत्या गुरूवार  दि. 15 ारोजी साजरा होणार आहे. जिल्हास्तरीय मुख्य  शासकीय कार्यक्रम हा जिल्हाधिकारी कार्यालय आवारात सकाळी 9 वा. 5 मि.नी. होणार आहे. हा मुख्य शासकीय  राष्ट्रध्वज वंदन  सोहळा राज्याचे  गृह (शहरे),  विधी व न्याय, संसदिय कार्य, माजी सैनिकांचे कल्याण , कौशल्य विकास आणि उद्योजकता राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. डॉ. रणजित पाटील यांच्या हस्ते होणार आहे. या सोहळ्यास जिल्ह्यातील स्वातंत्र्य सैनिक, सामाजिक- राजकीय कार्यकर्ते, लोकप्रतिनिधी, शासकीय अधिकारी-कर्मचारी आदींनी उपस्थित रहावे, असे  आवाहन जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी केले आहे.
                      या मुख्य सोहळयात  शासकीय अधिकारी – कर्मचारी, नागरीक तसेच शालेय – महाविद्यालयीन विद्यालयीन विद्यार्थ्यांना सहभागी होता यावे, यासाठी सकाळी  8 वा 35 मि.ते 9 वा 35 मि. या  दरम्यान  अन्यत्र कोठेही ध्वजारोहण  कार्यक्रमाचे आयोजन  करू नये. तसेच  प्लास्टीक व कागदी राष्ट्रध्वज प्रतिकृतींचा  वापर  थांबविण्यासाठी  जनजागृती करणे तसेच  काय्रक्रमानंतर  इतरत्र पडलेल्या राष्ट्रध्वज प्रतिकृती गोळा करून ते संबंधीत यंत्रणांकडे सुपुर्द करावे,असे आवाहन जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी केले आहे.
00000

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ