पालकमंत्र्यांनी केली विविध विकास कामांची पाहणी :पोलीस अधिक्षक कार्यालयासाठी लवकरच अत्याधुनिक सुसज्ज इमारत


 अकोला,दि.१९(जिमाका)-  अकोला जिल्ह्यासाठी पोलीस अधिक्षक कार्यालयाची नवीन,सुसज्ज व अत्याधुनिक इमारत तयार करण्यात येणार असून लवकरच हे काम सुरु होईल, अशी माहिती  राज्याचे गृह(शहरे), विधी व न्यायविभाग, संसदीय कार्य, माजी सैनिकांचे कल्याण, कौशल्य विकास आणि उद्योजकता विभागांचे राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. रणजीत पाटील यांनी आज येथे दिली. तसेच शहरात होत असलेले  विविध विकास कामेही वेळेत पूर्ण करतांना त्यांचा दर्जा उत्तम राखला जावा, असे निर्देशही ना. डॉ. पाटील यांनी दिले.
आज पालकमंत्री डॉ. रणजीत पाटील यांनी  शहरातील निर्माणधीन कामांची पाहणी केली. यावेळी  त्याच्या समवेत जिल्हाधिकारी  जितेंद्र पापळकर, मनपा आयुक्त संजय कापडनिस, जिल्हा पोलीस अधिक्षक अमोध गावकर हे होते. या पाहणीनंतर जिल्हाधिकारी कार्यालयात या कामांसंदर्भात आयोजित आढावा बैठकीत त्यांनी ही माहिती दिली.
आज सकाळी ना. डॉ. पाटील यांनी महत्त्वाच्या अधिकाऱ्यां समवेत सर्वप्रथम क्रीडा संकुल येथील सांस्कृतीक  भवनाच्या  बांधकामाची  पाहणी केली. सांस्कृतिक भवनाचे  बांधकाम  पुर्ण  झाले असुन कम्पाउंड  वॉल,  कॉस्टीक    साउंड  सिस्टीम,  फर्निचर व सिव्हील काम यांचे  काम होणे  बाकी आहे.   यासाठी लागणाऱ्या 10 कोटी रूपयांचा  निधीस मंजुरी  मिळाली असुन लवकर सुसज्ज  व अत्याधुनिक सांस्कृतिक  भवन अकोला शहरातील रसिकांच्या  सेवेसाठी तयार  होणार आहे. सांस्कृतिक भवन नियंत्रीत वेळेत पुर्ण करावे असे निर्देश ना. डॉ. पाटील यांनी दिले.
शहरातील अशोक वाटीका ते रेल्वेस्टेशन अशा  1.3 कि.मी.  अंतराच्या  उड्डाण पुलाचे काम  शहरात  सुरू असुन  या उड्डाण  पुलाच्या  कामाची पाहणी ही आज पालकमंत्री डॉ. रणजीत पाटील यांनी केली. उड्डाण पुलाच्या सुरू असलेल्या कामामुळे  वाहतुकीची कोंडी  निर्माण होत आहे. शहरवासीयांनी सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले. काम  वेगाने सुरू असुन नियोजि  वेळेत पुर्ण होईल,अशी ग्वाही यावेळी देण्यात आली.
अकोला शहरात 93 कोटी  रूपयांचा  निधी खर्च करून पोलीस कर्मचारी  वसाहत तयार करण्यात येत आहे.  या निर्माणधीन  कामाची पाहणी पालकमंत्री यांनी केली व कामाबद्दल समाधान व्यक्त केले.  येथे सुसज्ज  व सुंदर  अशी  पर्यावरणपूरक व शाश्वत इमारती तयार होत आहेत. सांडपाण्याचा पुर्नवापर, 10 हजार  चौ. फुटाचे  सभागृह इ. वास्तू तयार करण्यात येत असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. पुढील वर्षभरात या इमारती पुर्ण तयार  करण्यात येतील अशी माहितीही यावेळी देण्यात आली.
शहरात सुपर  स्पेशालिटी हॉस्पीटलचे  काम पुर्ण झाले असुन पुढील टप्प्यात  इलेक्ट्रीकल  तसेच फर्निचर   व यंत्रसामुग्री   बसविण्याचे काम सुरु आहे. या कामाची पाहणीही  ना.डॉ.रणजीत पाटील यांनी केली.  सुपर स्पेशालिटी हॉस्पीटलचे काम त्वरीत पुर्ण करण्याच्या सुचना त्यांनी यावेळी दिल्या.
पाहणी नंतर शहरातील  या निर्माणधीन कामांचा  आढावा घेण्यासाठी  जिल्हाधिकाऱ्यांच्या   दालनात आढावा बैठक घेण्यात आली.  ही कामे पूर्ण करण्यासाठी येणाऱ्या संभाव्य  अडी-अडचणी   त्यांनी जाणून घेतल्या. त्या अडचणी वेळेत दूर करण्याचे आश्वासन दिले तसेच प्रलंबित कामे ही  दर्जेदार व  नियोजित वेळेत पुर्ण  करा, असे निर्देशही ना. डॉ. पाटील यांनी संबंधित यंत्रणांना दिले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ