गणेश स्थापना व विसर्जन दिनी मद्य विक्री बंद


            अकोला,दि.31(जिमाका)-  गणेश चतुर्थी  हा उत्सव येत्या दोन सप्टेंबर पासून सुरु  होत आहे. या कालावधीत कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून  गणेश स्थापना दिवसव व विसर्जन कालावधीत जिल्ह्यातील मद्यविक्री बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी दिले आहेत.
             सोमवार दि.2 सप्टेंबर रोजी  (श्रीगणेश चतुर्थी) संपुर्ण दिवस बंद मद्यविक्री  अनुज्ञप्त्या बंद.
दि.12  ते 14 सप्टेंबर  श्री गणेश विसर्जन पर्व या कालावधीत ज्या दिवशी ज्या गावातील श्री विसर्जन होणार आहे त्या दिवशी त्या गावातील मद्यविक्री संपुर्ण दिवस बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या आदेशाचे  उल्लंघन केल्यास त्यांचे विरूद्ध  कायदेशीर कार्यवाही  करण्यात येईल, असेही  आदेशात नमुद करण्यात आले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ