शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार शासन निर्णयात सुधारणेसाठी सुचना मागविल्या


अकोला,दि.२२(जिमाका)- शिवछत्रपती राज्य क्रीडा जीवन गौरव पुरस्कार, उत्कृष्ठ क्रीडा मार्गदर्शक, शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार (खेळाडु), शिवछत्रपती राज्य साहसी क्रीडा पुरस्कार,एकलव्य राज्य क्रीडा पुरस्कार (दिव्यांग खेळाडु), उत्कृष्ट क्रीडा संघटक/ कार्यकर्ते व जिजामाता पुरस्कार शासनामार्फत दिले जातात. या संबंधातील शासननिर्णयात दिलेल्या अटी, निकष आदींबाबत सुधारणा करण्यासाठी नेमलेल्या समितीने खेळाडू, क्रीडा क्षेत्रातील व्यक्ती, तज्ज्ञ यांच्याकडून सुचना मागविल्या आहेत.
या पुरस्कारा बाबत दिनांक 16ऑक्टोबर 2017, दि.8 डिसेंबर 2017, दि.24ऑक्टोबर 2018 चे शासन निर्णयान्वये (शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेस्थळावर उपलब्ध आहे.) विहीत केलेल्या निकषांचा अभ्यास करुन निकष/नियमांमध्ये सुधारणा सुचविण्यासाठी शासनामार्फत समितीचे गठ करण्यात आले आहे.  या समितीने संबंधित शासननिर्णयान्वये विहित केलेल्या निकषांचा/नियमांचा अभ्यास करुन त्यात करावयाच्या सुधारणांबाबत अहवाल 15 दिवसात शासनास सादर रावयाचा आहे.तरी सर्व खेळाडु, दिव्यांग खेळाडू,साहसी क्रीडा प्रकारातील व्यक्ती, क्रीडा मार्गदर्शक, क्रीडा संघटक/ कार्यकर्ते, क्रीडाप्रेमी, विविध खेळाच्या एकविध खेळ राज्य संघटनांचे पदाधिकारी  यांनी शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्काराच्या उपरोक्त शासन निर्णयामध्ये बदल, निकष/नियमांमध्ये काही सुधारणा सुचवायच्या असल्यास आपल्या सुचना-अभिप्राय dsysdesk14@gmail.com  desk14.dsys-mh@gov.in या मेलवर सुचना पाठवाव्या,असे आवाहन क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य पुणे व अकोल्याचे जिल्हा क्रीडा अधिकारी आसाराम जाधव  यांनी केले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ