पोलीस भरती पूर्व प्रशिक्षण कार्यक्रम: उमेदवारांनी कागदपत्रे जमा करावीत; अल्पसंख्याक विकास विभागाचे आवाहन

                        अकोला,दि.28(जिमाका)- अल्‍पसंख्‍याक विकास विभागामार्फत पोलीस शिपाई भरती पूर्व प्रशिक्षण कार्यक्रम २०१९-२० चे प्रशिक्षण अंतर्गत उमेदवारांची निवड करण्‍याकरीता जिल्ह्यात दि.१९ ऑगस्‍ट रोजी एक दिवसीय कॅम्‍प लावण्‍यात आला होता. याअंतर्गत राज्‍यातील मुस्लिम, ख्रिचन ,बौध्‍द, पारसी, जैन आणि शिख या अल्‍पसंख्‍याक समाजातील इच्‍छूक उमेदवारांना शासनामार्फत विनामूल्‍य पोलीस शिपाई भरतीपूर्व प्रशिक्षण देण्‍यात येणार आहे.
            या प्रशिक्षणाकरीता इच्‍छूक उमेदवारांनी अर्ज सादर केले परंतू उमेदवारांनी आवश्‍यक कागदपत्र (जातीचा दाखला, टि.सी., १२ वी मार्कसिट, उत्‍पन्‍नाचा दाखला, रहिवासी दाखला, सेवायोजन कार्यालयांतर्गत नाव नोंदणी, ओळखपत्र) सादर केलेली नाहीत, अशा उमेदवारांनी जिल्‍हाधिकारी कार्यालय अल्‍पसंख्‍याक विभाग येथे सात दिवसाचे आत आवश्‍यक कागदपत्राची छायांकित प्रत जमा करावी. अन्‍यथा आपला अर्ज अपात्र ठरविण्‍यात येईल याची नोंद घ्‍यावी, असे अल्पसंख्याक विकास विभागातर्फे कळविण्यात आले आहे. 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ