जिल्हा तात्काळ प्रतिसाद केंद्राचे आज (दि.24) ना.धोत्रे यांच्या हस्ते लोकार्पण


      अकोला,दि.23(जिमाका)- राष्ट्रीय बाल आरोग्य अभियानाअंतर्गत येथील जिल्हा स्त्री रुग्णालयात जिल्हा तात्काळ प्रतिसाद केंद्राचे (District Early Intervention Centre) लोकार्पण केंद्रीय  मानव संसाधन, दूरसंचार, माहिती तंत्रज्ञान राज्यमंत्री  ना.संजय धोत्रे यांच्या हस्ते शनिवार दि.24 रोजी सकाळी 10 वाजता  होणार आहे. याच वेळी ना. धोत्रे यांच्या हस्ते जिल्हा परिषदेतर्फे आयोजित स्वच्छता महोत्सव रथयात्रेस हिरवी झेंडी दाखवून रवाना केले जाणार आहे. या कार्यक्रमास सन्माननीय लोकप्रतिनिधी,  जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद,  पोलीस अधिक्षक अमोघ गावकर, मनपा आयुक्त संजय कापडणीस  तसेच आरोग्य विभागाचे सर्व अधिकारी उपस्थित राहणार आहेत, असे जिल्हा स्त्री रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिक्षीका डॉ. आरती कुलवाल यांनी कळविले आहे.
 या जिल्हा तात्काळ प्रतिसाद केंद्रात शून्य ते 18 वर्षे वयोगटातील बालकांचे  विविध आजारांचे निदान  उपचार विविध तज्ज्ञांमार्फत  करण्याची सुविधा आहे. जेणे करुन लहान वयातच आजाराचे निदान होऊन लवकर उपचार करणे शक्य होईल. बालकांमधील विविध आजार व विकृतींबाबत या केंद्रावर संदर्भित करुन मार्गदर्शन व उपचार सुविधा उपलब्ध होईल. तरी या कार्यक्रमास उपस्थितीचे आवाहन  डॉ. आरती कुलवाल यांनी केले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ