सोयाबीन पिकावरील किडीचे सामुहिकरित्या एकीकृत कीड व्यवस्थापन


अकोला,दि.29(जिमाका)-    मागील आठवड्यात अकोला तालुक्यातील देवळी  व बाळापूर  तालुक्यातील सातरगाव येथे उंट अळीचा प्रादुर्भाव दिसून आला पिक फुलोरा अवस्थेत असतांना प्रादुर्भाव दिसून आला. त्या मुळे या किडीचा प्रादुर्भाव पुढील काही दिवसात इतरही भागामध्ये वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.
            त्या करिता शेतकऱ्यांनी कापूस पिक नियमित निरीक्षणात ठेऊन सामुहिकरित्या उपाय योजना करून या किडीचा प्रादुर्भाव वेळीच रोखणे शक्य होईल. शेतकरी बांधवानी सोयाबीन  पिकातील उंट अळीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी या प्रमाणे उपाययोजना कराव्यात.
१)     निंदनी व कोळपणी वेळेवर करावी.
२)     नत्रयुक्त खताचा समतोल वापर करावा.
३)     हेक्टरी २०-२५ पक्षी थांबे उभारावे.
४)   पाने खाणारी अळी, स्पोडोप्टेरा किडीच्या व्यवस्थापणासाठी किडीच्या प्रदुर्भावानुसार हेक्टरी १५ ते १८ कामगंध सापळे शेतात लावावे.
५)    चक्रीभुंगा व खोडमाशी प्रधुर्भाव ग्रस्त झाडे, पाने,फांद्या यांचा आतील किडी सह नायनाट करावा.
६)      पाने खाणाऱ्या अळ्या, चक्रीभुंगा आणि खोड माशी या किडींनी अंडी घालू नये या करिता सुरुवातीलाच  ५ % निंबोळी अर्काची फवारणी करावी. 
७)    तंबाखूवरील पाने खाणाऱ्या (स्पोडोप्टेरा) अळीचा प्रादुर्भाव आढळून येताच एस एल एन पि व्ही ५०० एल ई विषाणू २ मिली लिटर किवा नोमोरीया रिलाई बुरशीची ४ ग्राम, प्रती लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
८)    पिकांची फेरपालट  करावी.
किडीच्या नियंत्रणासाठी कीटकनाशकांचा वापर 
      १)पाने खाणारी अळी व उंटअळी
                      i)एन.एस.ई ५ % निंबोळी अर्क
ii) क़्विनॉलफॉस २५ इसी ३० मिली  किंवा
iii) प्रोफेनोफॉस ५० ईसी  २५ मिली किंवा   इडाक्झाकार्ब १५.८ एससी ७-१५ मिली
२) चक्री भुंगा व खोड माशी
i) ट्रायझोफॉस ४० ईसी १६ मिली किंवा  थायमेथोक्‍झाम १२.६% + लँमडा २.५ ग्राम
३) स्पोडोप्टेरा (तंबाखुवरील पाने खाणारी अळी)
 i) क़्विनॉलफॉस २५ इसी ३० मिली किवा
 ii)  इडाक्झाकार्ब १५.८ एससी ७ मिली किवा
 iii) प्रोफेनोफॉस ५० इसी २० मिली
प्रती १० लिटर पाण्या मध्ये मिसळून फवारणी करावी.
अशा प्रकारच्या उपाययोजना करून शेतकऱ्यांनी सोयाबीन पिकावरील किडींचे व्यवस्थापन करावे, असे जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, अकोला यांनी कळविले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ