श्रमिक पत्रकार संघ अकोला च्या वतीने पुरग्रस्तांना ब्लँकेटची मदत



अकोला,दि.16(जिमाका):- श्रमीक पत्रकार संघ अकोलाच्या वतीने सांगली व कोल्हापूर पुरग्रस्तांसाठी 316 ब्लँकेटची मदत  करण्यात आली आहे. सामाजिक दातृत्वाच्या भावनेतुन अकोला श्रमीक पत्रकार संघातर्फे  पुरग्रस्तांसाठी  ब्लॅंकेट्स जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांना  नियोजन  सभागृहात सुपूर्द करण्यात आले. यावेळी जिल्हा परिषदेचे  मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, निवासी उपजिल्हाधिकारी  राम लठाड, यांची प्रमुख उपस्थिती होती.
            अकोला श्रमीक पत्रकार संघाचे अजय डांगे , दत्तात्रय गांवडे, राजेश शेगोकार, मनोज भिवगडे, रविंद्र लाखोडे, महेंद्र  कविश्वर , सुरेश राठोड, प्रविण ठाकरे, जिवन सोनटक्के, निलेश जोशी , शंतनु राऊत , सचिन राऊत , गोपाल हागे , शरद पाचपोर, सचिन देशपांडे, संतोष येलकर,  निशाली पंचगाम, अनुप टाले, विवेक मेटकर, अतुल जयस्वाल, प्रबोध देशपांडे, शिवाजी भोसले, दिलीप ब्राम्हणे, निलम तिवारी , संगीता पातुरकर, सुगत खाडे, अमित गांवडे, निलेश भांगे यांची उपस्थिती होती.
000000

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्‌मय पुरस्कार प्रवेशिका व पुस्तके पाठविण्याचा कालावधी १ जानेवारी ते ३० जानेवारी २०२६

आदर्श आचारसंहिता निवडणूक आचार संहिता म्हणजे काय ?

महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळ अनुसूचित जातींसाठी विविध कर्ज योजना