विधानसभा निवडणूक २०१९: फिरत्या पथकांद्वारे मतदार जनजागृती सुरु


अकोला,दि.२१(जिमाका)- आगामी विधानसभा निवडणूक २०१९ च्या अनुषंगाने मतदारांमध्ये  व्हीव्हीपॅट इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र वापराबाबत जनजागृती करण्यात येत असून जिल्ह्यात ठिकठिकाणी मतदारांना मतदान यंत्रांची माहिती देऊन प्रात्यक्षिक दाखविले जात आहे. भारत निवडणूक आयोग यांच्या निर्देशानुसार जिल्ह्यातील पाचही विधानसभा मतदार संघ क्षेत्रात हे अभियान सोमवार (दि.१९) पासुन राबविण्यात येत आहे.
यासंदर्भात निवडणूक उपजिल्हाधिकारी राजेश खवले यांनी दिलेल्या माहितीनुसार, भारत निवडणूक आयोग यांच्या निर्देशानुसार सोमवार दि.१९ ते ३ ऑक्टोबर या कालावधीत ही मोहिम राबविण्यात येत आहे. या मोहिमेत ईव्हीएम व व्हीव्हीपॅट यंत्रांच्या कार्यप्रणालीची माहिती मतदारांना देण्यात येत आहे. माहिती देतांना मतदारांना प्रात्यक्षिक ही करुन दाखविले जात आहे.त्यासाठी मतदार संघ व तालुकानिहाय स्वतंत्र पथके तयार करण्यात आली आहेत.  प्रत्येक तालुक्यात  दोन फिरते पथके तयार करण्यात आले असून जिल्ह्यातील सर्व १०१२ गावांमध्ये ही पथके जाऊन मोक्याच्या व गर्दीच्या ठिकाणी जनजागृती करुन मतदारांना प्रात्यक्षिके दाखवणार आहेत. जिल्ह्यातील मतदारांनी या प्रात्यक्षिक स्थळांना भेटी देऊन मतदान यंत्र व व्हीव्हीपॅट यंत्रांबाबत व त्यांच्या कार्यप्रणाली बाबत माहिती  करुन घ्यावी, असे आवाहन जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर  यांनी केले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ