कावड पालखी मिरवणूक मार्गावरील रहदारीत बदल


अकोला, दि.१४ (जिमाका)- श्रावण महिन्यात कावड पालखी मिरवणूकांना वाहतुकीचा व्यत्यय होऊ नये यासाठी  अकोला- दर्यापूर मार्ग व अकोला शहरातील मिरवणूक मार्गावरील रहदारीच्या मार्गात बदल करण्यात आला आहे.
अकोला- दर्यापूर मार्गावरील रहदारी तिसरा सोमवार दि.१८ च्या दुपारी दोन वाजेपासून ते  दि.१९ रोजी सायं. ७ वाजेपर्यंत तर अकोला शहरातील कावड पालखी मिरवणूक मार्गावरील वाहतुक  दि. १८ चे रात्री आठ ते १९ रोजीचे मध्यरात्री पर्यंत  बदल करण्यात आला आहे. तर चौथा व शेवटच्या सोमवार दि. २५ रोजी अकोला- दर्यापूर मार्गावरील रहदारी दुपारी १२ ते  दि.२६ चे रात्री आठ वाजे पर्यंत तर अकोला शहरातील मार्गात दि. २५ रोजी रात्री आठ ते दि.२६ रोजी मध्यरात्रीपर्यंतच्या कालावधीसाठी  जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्या आदेशान्वये बदल करण्यात आले आहेत.
करण्यात आलेले बदल याप्रमाणे-
अकोला-अकोट राज्य महामार्गावरील व अकोला दर्यापूर मार्गावरील वाहतुक
अकोला बसस्थानक –रेल्वेस्टेशन चौक , आपातापा चौक- गांधीग्राम मार्गे अकोट कडे जाणारी वाहतूक व अकोट ते अकोला कडे याच मार्गाने येणाऱ्या वाहतुकीसाठी पर्यायी मार्ग अकोला बसस्थानक- भगतसिंग चौक- वाशिम बायपास- शेगाव टी पॉईंट- गायगाव- निंबा फाटा- देवरी फाटा- अकोट तसेच अकोट ते अकोला येणारी वाहतुक याच मार्गाने वळविण्यात येईल.
अकोला बसस्थानक – रेल्वेस्टेशन चौक- आपातापा चौक- म्हैसांग मार्गे दर्यापूर तसेच दर्यापूर ते अकोला कडे याच मार्गाने येणारी वाहतूक  अकोला बसस्थानक- टॉवर चौक- रेल्वे स्टेशन – टिळक पार्क मार्गे- सातव चौक – न्यू तापडीया नगर- खरप टी पॉईंट- म्हैसांग मार्गे दर्यापूर तसेच दर्यापूर ते अकोलाकडे येणारी वाहतुक याच मार्गाने वळविण्यात येईल.
अकोला शहरातील मार्गावरील रहदारीत बदल
डाबकी रोड – जुने शहर- श्रीवास्तव चौक-विठ्ठल मंदिर- अलका बॅटरी चौक- जयहिंद चौक- कोतवाली चौक- गांधी चौक- अकोला बसस्थानक  तसेच डाबकी रोड जुने शहर ते भिमनगर चौक दगडीपुल मार्गे मामा बेकरीकडे जाणारी वाहतुकीसाठी  डाबकी रोस्ड- जुने शहर- भांडपुरा चौक- पोळा चौक- किल्ला चौक- हरिहर पेठ- वाशिम बायपास चौक- राष्ट्रीय महामार्ग ६ ने लक्स्झरी स्टॅंड- जेल चौक- अशोक वाटीका चौक ते अकोला बसस्थानक या मार्गाने वळविण्यात आली आहे.
अकोला बसस्थानक- गांधी चौक- कोतवाली चौक- जयहिंद चौक- डाबकी डोड तसेच पोळा चौक- हरीहरपेठ कडे जाणारी वाहतुक ही अकोला बसस्थानक –अशोक वाटीका चौक- नेहरू पार्क चौक- हुतात्मा चौक- जेल  चौक- लक्झरी स्टॅंड- वाशिम बायपास चौक- हरिहर पेठ- किल्ला चौक- भांडपुरा चौक- जुने शहर- डाबकी रोड या मार्गाने वळविण्यात आली आहे.
रेल्वे ओव्हर ब्रीज- अकोट स्टॅंड- टिळक रोड मार्गे- बियाणी चौक- कोतवाली चौक-लक्झरी बस स्टॅंड- वाशिम बायपास कडे जाणारी वाहतुक ही रेल्वे ओव्हर ब्रीज- रेल्वे स्टेशन चौक- अग्रसेन चौक- टॉवर चौक- धिंग्रा चौक- अशोक वाटीका-  नेहरु पार्क चौक- हुतात्मा चौक- भगतसिंग चौक- वाशिम बायपासकडे या मार्गे वळविण्यात आली आहे.
 लक्झरी बसस्थानक- कोतवाली चौक- टिळक रोड मार्गे अकोट स्टॅंड्कडून रेल्वे स्टेशनकडे जाणारी वाहतुक ही लक्झरी बसस्थानक चौक- जेल चौक- अशोक वाटिका चौक- टॉवर चौक- अग्रसेन चौक- रेल्वे स्टेशन चौक मार्गे वळविण्यात आली आहे.  

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ