शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था मुर्तिजापुर येथील निकामी अवजारे व साहित्याची विक्री



अकोला, दि.8 (जिमाका)- शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था , मुर्तिजापुर जि.अकोला येथील खालील  व्यवसायातील निलैखित हत्यारे व  साहित्य तथा परिक्षेचे जॉब स्क्रॅप  निविदाव्दारे  विक्री करावयाचे आहे तरी अधिकृत  फर्म कडून विहीत नमुन्यात निविदा  मागविण्यात आल्या आहेत. त्याचा तपशिल खालीलप्रमाणे-
निविदा विक्रीचा कालावधी दि. 16 ऑगस्ट 2019 ते  20 ऑगस्ट 2019  सकाळी 11.00 ते 5.00 पर्यंत , निविदा स्विकृतीचा  दि. 22 ऑगस्ट 2019  दुपारी 3 वाजे पर्यंत , निविदा उघडण्याचा दि. 26 ऑगस्ट 2019 दु. 2.00 वाजता.
निकामी साहित्य व हत्याराचे नाव- ड्रेसमेकींग , बेसिक कॉसमेटोलॉजी, विजतंत्री यांत्रीक मोटार गाडी, संधाता, इलेक्ट्रानिक्स मेकॅनिक  शेरा  - संबधीत साहित्य व हत्यारे इत्यादी ची विस्तृत यादी व  प्रत्येक साहित्य निविदा  उचलतांना संस्थेत पहावयास मिळेल.
नियम व अटी - उपरोक्त निविदा सुचनेतील निर्लेखित सामुग्री संस्थेमध्ये दि. 16 ऑगस्ट 2019 ते 20 ऑगस्ट 2019  पर्यंत  11 ते 5  या वेळेत पहावयास मिळेल  , निविदा शुल्क रू. 500/- रोखपाल यांचेकडे भरून ती पावती दाखवून  भांडातून  घेउन जावी, सुरक्षा ठेव म्हणून रू. 2000/- भरावे लागेल व ती निविदा  प्रक्रीयेची कार्यवाही पुर्ण होईपर्यंत परत  दिली जाणार नाही, प्राचार्य, शासकीय औद्योगीक प्रशिक्षण संस्था मुर्तिजापूर यांनी  निवेदेतील सामुग्री कमी अधिक करावयाचे  असल्यास कोणतेही कारण    देता निविदा  नाकारण्याचे अधिकार  स्वत:कडे राखुन ठेवलेले आहे,असे  शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था मुर्तिजापूर, जि. अकोला यांनी कळविले आहे.
00000

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ