कल्याणकारी निधीमधुन माजी सैनिक / विधवांच्या पाल्यांना शिष्यवृती व विद्यावेतनसाठी अर्ज आमंत्रीत



            अकोला,दि.03 (जिमाका)-  माजी सैनिक / विधवांच्या पाल्यांना माध्यमिक शालांत शिक्षणा पासुन ते पदव्युत्तर आणि इतर उच्च शिक्षण होईपर्यंत शिक्षणाची उत्तम संधी उपलब्ध करुन देण्याच्या दृष्टीने सैनिक कल्याण विभाग, पुणे यांच्या तर्फे सन-2019-20 या शैक्षणिक सत्राकरीता शिष्यवृती देण्यात येईल .                                                                                                
            माजी सैनिक व त्यांच्या विधवा पत्नी त्यांच्या पाल्यांकरीता जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, अकोला येथे विहीत नमुन्यामध्ये अर्ज करावेत . विहीत नमुन्याचे अर्ज या कार्यालयात मिळतील.
            एस.एस.सी.परिक्षा उत्तीर्ण गुणपत्रीकेची झेरॉक्स प्रत व पुढील शिक्षण घेत असल्याबाबत शैक्षणिक संस्थेचा दाखला , 12 व्या वर्गाची परिक्षा उत्तीर्ण ,गुणपत्रीकेची  झेरॉक्स व पुढील शिक्षण घेत असल्याबाबत शैक्षणिक संस्थेचा दाखला तसेच पदवीधर उर्त्तीर्ण ,गुणपत्रीकाची झेरॉक्स  व पुढील शिक्षण घेत असल्याबाबत शैक्षणिक संस्थेचा दाखला . शैक्षणिक संस्थेकडून शिष्यवृती मिळत नाही / किंवा मिळत आहे अशा प्रकार चा दाखला आवश्यक आहे सर्वच नवीन शिष्यवृत्ती करीता सरासरी कमीत कमी 60 %  गुण असणे अत्यावश्यक आहे ज्या माजी सैनिक / विधवांच्या पाल्यांना सन-2018-19 ची शिष्यवृत्ती मिळाली आहे.त्यांनी सन-2018-19 या शैक्षणित सत्रात  मध्ये पास झाल्याची गुणपत्रीकाची  झेरॉक्स साक्षांकीत करुन  तसेच सन 2019-20 मधे पुढील शिक्षण घेत असल्याबाबत शैक्षणिक संस्थेचा दाखला, कार्यालयातील अर्ज भरुन त्या सोबत लागणरी कागद पत्राच्या छायांकित प्रत जोडावी.
        ज्या पाल्यांनी CET/JEE किंवा इतर कारणासाठी गैप घेऊन शैक्षणिक वर्ष 2017-2018 मध्ये प्रथम वर्षासाठी प्रवेश घेतला आहे ,अशा पाल्यांना प्रकरणासोबत Gap Certificate (स्वयंघोषणापत्र)घेऊन शिष्यवृत्तीचअर्जे सादर करवे.                                           
सदर विद्यावेतन मिळणेबाबत संबंधितांनी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, अकोला यांच्या कार्यालयात दिनांक 30 ऑक्टोंबर 2019 च्या पुर्वी अर्ज पोहचतील अशा रितीने पाठवावे.या तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जावर विचार केला जाणार नाही याची नोंद घ्यावी.असे जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी (प्रभारी)  आर ओ लठाड  यांनी कळविले आहे.
सदर शिष्यवृत्ती ही माजी सैनिक /विधवांच्या 15 ऑगष्ट 1968 पर्यत  जन्मलेले चौथे या नंतरचे  अपत्यास अनुदेय नाही. पुढील शिक्षण घेत असलेल्या प्रमाणपत्रा मधे महाविद्यालया मधुन शिष्यवृत्ती घेत असल्यास रक्कम  नमुद करावी. शैक्षणिक संस्थेकडून शिष्यवृत्ती मिळत नाही किंवा मिळत आहे अशा प्रकारचे प्रमाण पत्र         किंवा दाखला प्रकरणासोबत सादर करावा. मा.पंतप्रधान शिष्यवृत्ती योजने अतंगर्त ज्या माजी सैनिक / विधवांनी सदर शिष्यवृत्तीचा  अर्ज केला असल्यास या कार्यालया मार्फत मिळण्यात येणा-या शिष्यवृती चा अर्ज देतांना अर्जामधे सदर शिष्यवृती बाबत नमुद करावे. अधिक माहितीसाठी जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा.  0000000000000


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ