पालकमंत्री डॉ.रणजित पाटील यांची सहृदयता; एक महिन्याचे वेतन दिले पूरग्रस्तांसाठी




अकोला,दि.9(जिमाका):- राज्याचे गृह(शहरे), विधी व न्यायविभाग, संसदीय कार्य, माजी सैनिकांचे कल्याण, कौशल्य विकास आणि उद्योजकता विभागांचे राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ.रणजित पाटील यांनी माणुसकी धर्माला जागत सहृदयतेचे दर्शन घडविले आहे. ना.डॉ.पाटील यांनी आपले एक महिन्याचे वेतन राज्यातील पूरग्रस्तांसाठी मदत म्हणून मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी देऊ केला आहे.
राज्यातील पश्चिम महाराष्ट्रात तसेच कोकणातील विविध भागात पूर स्थिती निर्माण झाल्याने लोकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. या स्थितीत प्रशासन मदत व बचाव कार्य करीत आहेत. समाजातील विविध घटक आपापल्या परीने मदत व बचाव कार्यात योगदान देत आहेत. ना.डॉ.रणजित पाटील यांनीही आपले एक महिन्याचे वेतन मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी देऊ केला असून तसे पत्र सामान्य प्रशासन विभागाच्या अवर सचिवांना दिले आहे.

00000000

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ