जालन्यात रेशीम कृषी प्रदर्शन; इच्छुकांना नोंदणी करण्याचे आवाहन


        अकोला,दि.22(जिमाका)-जालना येथे 1 सप्टेंबर रोजी रेशीम दिनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. त्यानिमित्ताने रेशीम संचालनालयाच्या वतीने 30 ऑगस्ट ते 1 सप्टेंबर या कालावधीत रेशीम कृषि  प्रदर्शन भरविण्यात येणार आहे. याप्रदर्शनात रेशीम उत्पादक शेतकऱ्यांना रेशीम साहित्य निर्मिती करणारे शेतकरी, संस्था, कृषि कंपन्या, खाद्यपदार्थ विक्री करणारे, रेशीम कृषिसाठी उपयुक्त साहित्यनिर्मिती करणारे उत्पादक विविध बचतगट यांना सहभागी होता येणार आहे. त्यासाठी इच्छुक व्यक्ती, कंपनी, बचत गट,संस्था, शासकीय निमशासकीय कार्यालये, विद्यापीठे,कृषि  विज्ञान केंद्रे, शासकीय संस्था यांनी सहभागी होण्यासाठी दि.26 ऑगस्ट पर्यंत नोंदणी करावी. नोंदणी करण्यासाठी रेशीम संचालनालयाच्या दूरध्वनी क्र. 0712-2269924, 2569926 किंवा जालना येथी जिल्हा रेशीम कार्यालयाच्या दूरध्वनी क्र. 02482-229047 संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा रेशीम विकास अधिकारी,अकोला यांनी केले आहे .

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ