सन्मान कष्टाचा, आनंद उद्याचा:बांधकाम कामगारांनी नोंदणी करावी-ना.डॉ. संजय कुटे
अकोला,दि.1४ (जिमाका)- सर्व कामगार हे एक
कुटूंब आहे. त्यांच्या परिश्रमांमुळे या जगाचा कारभार चालतो. अशा या कामगारांच्या जीवनात परिवर्तन घडविण्याचे काम सरकार
करीत असून शेवटच्या घटकापर्यंत योजनांचा लाभ पोहोचविला जात आहे. बांधकाम
कामगारांना विविध 29 प्रकारच्या योजनांचा लाभ शासन देत आहे, तरी कामगारांनी आपली
नोंदणी कामगार अधिकाऱ्यांकडे अवश्य करुन घ्यावी, असे आवाहन राज्याचे कामगार ,इतर मागासवर्ग,
सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्ग, विमुक्त
जाती, भटक्या जमाती आणि विशेष मागासप्रवर्ग कल्याण विभागाचे
मंत्री डॉ. संजय कुटे यांनी आज येथे केले.
इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या वतीने ‘सन्मान कष्टाचा आनंद उद्याचा’ या
ब्रीद वाक्यानुसार आज ना. डॉ. कुटे यांच्या हस्ते इमारत बांधकाम कामगारांना विविध
सुरक्षा संच व लाभांचे वाटप करण्यात आले.
येथील एमआयडीसी
मेन रोड, एमआयडीसी फेज-4, गिरीराज
स्टिलच्या समोर शिवणी येथे आज हा कार्यक्रम पार पडला.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी
मंडळाचे अध्यक्ष ओमप्रकाश (मुन्ना ) यादव हे होते. या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून महापौर
विजय अग्रवाल, आ. गोवर्धन शर्मा, आ. प्रकाश भारसाकळे, आ. हरिष
पिंपळे, आ. रणधीर सावरकर तसेच उद्योग, इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाचे सचिव श्री.चु. श्रीरंगम, जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर,
जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद,उपमहापौर वैशाली शेळके, जि.प. माजी अध्यक्ष श्रावण इंगळे,अपर कामगार आयुक्त वि.रा. पानबुडे, आणि सहाय्यक कामगार आयुक्त राजू
गुल्हाने यांची उपस्थिती होते.
ना. डॉ. कुटे यांच्या हस्ते इमारत बांधकाम कामगारांसाठी असलेल्या २९ विविध कल्याणकारी योजनांच्या विविध लाभांचे वाटप करण्यात आले. ते पुढे म्हणाले
की, बांधकाम व अन्य संलग्नित २१ प्रकारची कामे करणाऱ्या व्यक्तींना बांधकाम कामगारांच्या योजनांचा
लाभ घेता येतो. ग्रामिण भागातील इमारत
बांधकाम मजूर व कामगारांची नोंदणी करणे आवश्यक असून या नोंदणीसाठी ३१ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ देण्यात
आली आहे. तरी अकोला जिल्ह्यातील शहरी व ग्रामिण भागातील बांधकाम कामगारांनी आपली नोंदणी
करुन घ्यावी,असे आवाहन त्यांनी केले.
यावेळी
आ. रणधीर सावरकर यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाचे सचिव श्री.चु. श्रीरंगम यांनी केले व अपर कामगार
आयुक्त विऱा. पानबुडे यांनी उपस्थितांचे आभार मानले. या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने
कामगार बंधू भगिनी उपस्थित होते.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा