नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्पातंर्गत गटांची सांगड घालण्याकरीता कार्यशाळा



        अकोला,दि.9(जिमाका):- नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्पातंर्गत महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन्नोती अभियान व आर्थ‍िक विकास महामंडळ यांच्या गटांची  सांगड  घालण्यासाठी  मंगळवार 13 ऑगस्ट 2019 रोजी  जिल्हाधिकारी  जितेंद्र पापळकर यांच्या अध्यक्षतेखाली डॉ. पंजाबराव देशमुख  कृषि विद्यापीठ येथील शेतकरी सदन येथे सकाळी  11 वाजता आयोजीत केली आहे.
            सदर कार्यशाळेत प्रकल्पाची तोंड ओळख या विषयावर प्रकल्प विशेषज्ञ कृषि सागर डोंगरे हे मार्गदर्शन करणार आहे. यावेळी सेंट्रल बँक ऑफ इंडियाचे  शाखा व्यवस्थापक अमोल रोहणकर हे प्रकल्प आराखड्यांचे  बँक स्तरावरील  मुल्यमापन , उपविभागीय कृषि अधिकारी अजय कुळकर्णी हे कृषि व्यवसाय प्रकल्प छाणनी ,  कृषि व्यवसायातील  प्रकल्प विशेषज्ञ नागेश ठाकरे हे  कृषि व्यवसाय घटक या विषयावर  मार्गदर्शन करणार आहे.
            तरी प्रकल्पातंर्गत  गावातील भुमिहीन , अल्प व अत्यल्प भुधारक शेतकरी , नोंदणीकृत शेतकरी गट , शेतकरी उत्पादक कंपनीचे प्रतिनीधी यांनी उपस्थित  राहून योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन प्रकल्प संचालक आत्मा मोहन वाघ यांनी केले आहे.
                                                           000000

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ