तुतीची लागवड करण्याचे आवाहन

          अकोला,दि.22(जिमाका)- जिल्हा रेशीम कार्यालय, अकोला अंतर्गंत ज्या शेतकऱ्यांनी सन 2019-20 करीता तुती  लागवड कोष उत्पादन योजने अंतर्गंत नाव नोंदणी (रजिस्ट्रेशन) केली आहे,अशा शेतकऱ्यांपैकी ज्यांची पावसाअभावी तुती लागवड अद्याप झालेली नाही, त्यांनी त्वरीत तुती लागवड करुन घ्यावी,असे आवाहन रेशीम विकास अधिकारी अकोला यांनी केले आहे. सध्या जिल्ह्यात तुती लागवडीसाठी सर्वदूर समाधानकारक पाऊस  झाला आहे. तसेच तुतीची रोपे मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहेत. तेव्हा वेळेत तुती लागवड करुन घ्यावी. जेणे करुन शासकीय योजनेचा लाभ घेता येईल, असे आवाहन रेशीम विकास अधिकारी , अकोला यांचे वतीने  करण्यात आलेआहे. अधिक माहितीसाठी  जिल्हा रेशीम कार्यालय,प्लॉट क्र. 8,9,10. एम.आय.डी.सी. फेस-1 शिवर, अकोला.फोन क्र.0724-2259037, 2258036 email-akolareshim@gmail.com येथे संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ