किटकनाशके वापरताना घ्यावयाची काळजी


                          अकोला,दि.28(जिमाका)- सध्याच्या हवामानातील बदलामुळे पिकांवर किड रोगांचा  प्रादुर्भाव वाढत असल्याचे निदर्शनास येत आहे. किड रोगांच्या नियंत्रणासाठी  शेतकऱ्यांकडून मोठ्या प्रमाणात  किटकनाशकांची  फवारणी  करण्यात येते. मात्र असुरक्षीत  हाताळणीमुळे शेतकऱ्यांना  विषबाधा   होण्याच्या घटना घडतात. या घटना घडू नये म्हणून किटकनाशके हाताळताना घ्यावयाची काळजी याबाबत माहिती-
            लेबलमधली दिशानिर्देश  काळजीपुर्वक  वाचावेत आणि त्यांचे  अनुकरण करावे. त्यावरील चेतावणी आणि  सावधगिरीकडे विशेष लक्ष द्यावे, किटकनाशकांच्या  डब्यावरील मार्गदर्शक चिन्हाकडे  काळजीपुर्वक  लक्ष  द्यावे. लाल रंगाचे चिन्ह/खुण  असलेली औषधे सर्वात अधिक विषारी असुन त्यानंतर पिवळा , निळा व हिरवा असा क्रम लागतो,
किटकनाशके थंड, कोरड्या आणि सुरक्षित  जागी कुलुप  लावुन  मुलांपासुन दुर ठेवावीत, किटनाशके नेहमी त्यांच्या मुळ डब्यात साठवावीत  आणि  कधीही ती खाद्य आणि खाद्य सामग्रीसह साठवू नये, किटकनाशकांचे रिकामे डबे, बाटल्या, खोकी इत्यादीचा  पुर्नवापर  करू नये,  फवारणी करीता  गळक्या  फवारणी यंत्राचा  वापर करू नये,फवारणी करीत गळक्या  फवारणी  यंत्राचा  वापर करू नये,  किटकनाशके हाताळतांना  सुरक्षीततेच्या  दृष्टिने रबरी हातमोजे, लांब पँट आणि  लांब बाहीचे  शर्ट वापरावेत तसेच  पायात बुट, नाक व तोडांवर मास्क/रोस्पायरेटरचा वापर करावा, किटकनाशके वापरानंतर लगेच कपडे बदलुन हात धुवावेत. फवारणीसाठी वापरावयाची कपडे स्वतंत्र ठेवावीत तसेच , ती वेळोवळी   स्वच्छ धुवावीत, किटकनाशके  विहीरी किंवा इतर जलस्त्रोताचा  जवळपास कधीही मिसळू नयेत अथवा त्याठिकाणी  किटकनाशके वापरलेली भांडी स्वच्छ करू नयेत, उघड्या हातांनी किटकनाशके कधीही ढवळू  नयेत.  त्याकरीता काठीचा वापर  करावा तसेच  किटकनाशकांचा  वास घेणे टाळावे,  किटकनाशकांचे शिल्लक द्रावण पडीक  जमीनीत  खड्डा  करून  पुरून टाकावे. बंद पडलेला नोंझल स्वच्छ करण्यासाठी  तोंड लावुन फुंकू नये, त्यासाठी तार किंवा  काडी किंवा  टाचणीचा वापर करावा, रिकाम्या पोटी फवारणी करू नये, किटकनाशके वापरतांना  खाऊ, पिऊ किंवा  धुम्रपान करू नये, खाण्यापुर्वी किंवा पिण्याआधी हात व चेहरा धुवावा, किटकनाशक फवारणी नेहमी  वा-याच्या दिशेने करावी,किटकनाशके शरीरावर पडणार नाही याची काळजी घ्यावी.  शरीरावर जखमा असलेल्या व्यक्तींनी किटकनाशके हाताळू नये, असे आवाहन विभागीय कृषि सहसंचालक, अमरावती सुभाष नागरे यांनी केले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आदिवासी विकास योजनांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन

महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळ अनुसूचित जातींसाठी विविध कर्ज योजना

राज्य माहिती आयोग अमरावती खंडपीठाकडे इ-मेलद्वारे अर्ज करावा