अकोला येथे शुक्रवारी (दि.१२) रोजगार मेळावा

 अकोला,दि.८(जिमाका)- येथील मुलभुत प्रशिक्षण तथा अनुषंगिक सुचना केंद्र व वॅरोक इंजिनिअरींग लि. वाळुंज जि. औरंगाबाद यांच्या संयुक्त विद्यमाने  शुक्रवार दि.१२ रोजी रोजगार भरती मेळावा आयोजित करण्यात आला आहे.  हा मेळावा मुलभुत प्रशिक्षण तथा अनुषंगिक सुचना केंद्र द्वारा औद्योगिक प्रशिक्षण संस्था, अकोला येथे होणार आहे. या मेळाव्यात फिटर, टर्नर, वेल्डर,  इलेक्ट्रिशियन, डिजेल मेकॅनिक, यंत्र कारागिर, संगणक या व्यवसायातील आयटीआय उत्तीर्ण तसेच परीक्षेत प्रविष्ट असलेल्या प्रशिक्षणार्थ्यांना रोजगाराची संधी दिली जाईल. इच्छुक पात्रता धारक उमेदवारांनी मेळाव्यास उपस्थिती नोंदवावी. अधिक माहिती व मार्गदर्शनासाठी अंशकालीन प्राचार्य, मुलभुत प्रशिक्षण तथा अनुषंगिक सुचना केंद्र द्वारा औद्योगिक प्रशिक्षण संस्था, अकोला यांनी कळविले आहे.

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्‌मय पुरस्कार प्रवेशिका व पुस्तके पाठविण्याचा कालावधी १ जानेवारी ते ३० जानेवारी २०२६

आदर्श आचारसंहिता निवडणूक आचार संहिता म्हणजे काय ?

महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळ अनुसूचित जातींसाठी विविध कर्ज योजना