रॅपिड ॲन्टीजेन टेस्टः 94 चाचण्यात कोणाचाही अहवाल पॉझिटीव्ह नाही
अकोला,दि. 3(जिमाका)- कोरोना
संसर्ग चाचणीसाठी जिल्ह्यात रॅपिड ॲन्टीजन टेस्ट राबविण्यात येत आहे. यात आज
दिवसभरात झालेल्या 94 चाचण्या झाल्या त्यात कोणाचाही अहवाल पॉझिटीव्ह
आला नाही, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी
संजय खडसे यांनी दिली.
आज दिवसभरात अकोट येथे 22, बार्शिटाकळी
येथे एक, तेल्हारा येथे दोन, मुर्तिजापूर येथे 10, आरोग्य कर्मचाऱ्यांचे 16 तर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात 43 चाचण्या झाल्या त्यात कुणाचाही
अहवाल पॉझिटीव्ह आला नाही. अशा एकूण 94 चाचण्यांमधून कोणाचाही अहवाल पॉझिटीव्ह आला
नाही. आतापर्यंत जिल्ह्यात 32 हजार 105
चाचण्या झाल्या पैकी 2109 जणांचे अहवाल
पॉझिटीव्ह आले आहेत.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा