रॅपिड ॲन्टीजेन टेस्टः 151 चाचण्यात 27 पॉझिटीव्ह
अकोला,दि. 20(जिमाका)- कोरोना
संसर्ग चाचणीसाठी जिल्ह्यात रॅपिड ॲन्टीजन टेस्ट राबविण्यात येत आहे. यात काल (दि.19) दिवसभरात झालेल्या 151 चाचण्या झाल्या त्यात 27 जणांचा
अहवाल पॉझिटीव्ह
आला, अशी माहिती निवासी
उपजिल्हाधिकारी संजय खडसे यांनी दिली.
आज दिवसभरात अकोट येथे 16 चाचण्या झाल्या त्यात सात जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले, बार्शीटाकळी येथे 27, तेल्हारा
येथे 27, मुर्तिजापूर येथे 10, अकोला आयएमए येथे एक, आरोग्य कर्मचाऱ्याचे 22 चाचण्या झाल्या त्यात कोणाचाही अहवाल पॉझिटिव्ह आला नाही, शासकीय वैद्यकीय
महाविद्यालयातून 36 चाचण्या
झाल्या त्यात 12 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले, हेगडेवार लॅब
येथे 12 चाचण्या झाल्या त्यात आठ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले, असे एकूण 151 चाचण्यांमधून 27 जणांचा अहवाल पॉझिटीव्ह
आला. आतापर्यंत जिल्ह्यात 33 हजार 656 चाचण्या झाल्या पैकी 2348 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह
आले आहेत.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा