कालवडी ता. अकोट व अकोट; सर्तक क्षेत्र घोषित


अकोला,दि.5 (जिमाका)- कालवडी ता. अकोट येथील अक्षय संजय शेगोकार व अकोट येथील राजू सोळंके शासकीय आयटीआय समोर यांच्या परसातील देश कुक्कूट पालन फार्ममध्ये पक्षी मृत आढळले असून त्या मृत पक्षांचे नमूने घेऊन ते रोग अन्वेषण विभाग पुणे मार्फत राष्ट्रीय उच्च सुरक्षा पशुरोग संस्था, भोपाळ येथे पाठविण्यात आले आहेत. हा अहवाल येईपर्यंत कालवडी ता. अकोट येथील अक्षय संजय शेगोकार व अकोट येथील राजू सोळंके शासकीय आयटीआय समोर यांच्या पसरातील कुक्कूट फार्म केंद्रबिंदु मानुन  10 कि.मी. त्रिज्या परिसर सतर्क क्षेत्र घोषित करण्यात आले असल्याचे आदेश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी निर्गमित केले आहेत.

सतर्कतेचा आदेश निर्गमित -

मौजे कालवडी ता. अकोट येथील अक्षय संजय शेगोकार व अकोट येथील राजू सोळंके शासकीय आयटीआय समोर यांच्या पसरातील कुक्कूट केन्द्रबिंद मानूण त्या क्षेत्रापासून आजूबाजूचा 10 कि.मी. त्रिज्येतील क्षेत्र सतर्क क्षेत्र व सर्वेक्षण झोन म्हणून जाहीर करण्यात आले आहे. प्रभावित क्षेत्राच्या ठिकाणी वाहनांच्या येण्याजाण्यास मनाई करण्यात येत आहे. तसेच त्या ठिकाणीची खाजगी वाहने प्रभावित परिसराच्याबाहेर लावण्यात यावीत, प्रभावित क्षेत्रात जिवंत व  मृत कुक्कूट पक्षी, अंडी, कोंबडीखत, पक्षीखाद्य, अनुषांगिक साहित्य व उपकरणे इत्यादीच्या वाहतूकीस मनाई करण्यात येत आहे, प्रभावित पोल्ट्री फार्मच्या परिसरात नागरीकांच्या हालचालिस, तसेच इतर पक्षी आणि प्राण्यांच्या वाहतुकीस प्रतिबंध करण्यात येत आहे. प्रभावी क्षेत्रातील परिसरामध्ये दोन टक्के सोडियम हायड्रोक्साईड किवा पोटॅशियम परमॅगनेटने निर्जंतुकीकरण करावे, प्रभावित क्षेत्रातील पोल्ट्री फार्ममध्ये काम करणाऱ्या व्यक्तीनी चेहऱ्यावर मास्क लावणे तसेच हातामोजांचा वापर करणे अनिवार्य आहे. वापरण्यात आलेल्या मास्क तसेच हातमोजांची  योग्यप्रमाणे विल्हेवाट लावण्यात यावी.

            प्रभावित क्षेत्रातील पोल्ट्रीफार्म मध्ये इतर कुठलेही पशु-पक्षी येणार नाही याची दक्षता घेण्यात यावी, प्रभावित क्षेत्रातील पोल्ट्रीफार्म मधील पक्षांसंबंधीच्या आवश्यक त्या सर्व नोंदी अद्यावत व व्यवस्थीत ठेवण्यात याव्यात, तसेच परिसरामध्ये जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्तांनी खबरदारीचे उपाय व सर्वेक्षणाचे काम त्वरीत सुरु करुन आवश्यक त्या उपाययोजना  कराव्यात, असे आदेशात नमूद केले आहे.


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्‌मय पुरस्कार प्रवेशिका व पुस्तके पाठविण्याचा कालावधी १ जानेवारी ते ३० जानेवारी २०२६

आदर्श आचारसंहिता निवडणूक आचार संहिता म्हणजे काय ?

महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळ अनुसूचित जातींसाठी विविध कर्ज योजना