267 अहवाल प्राप्त, 46 पॉझिटीव्ह, 19 डिस्चार्ज
अकोला,दि.7(जिमाका)-आज दिवसभरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रयोगशाळेतून (सायंकाळी पाच वाजेपर्यंत)
कोरोना संसर्ग तपासणीचे 267 अहवाल प्राप्त झाले. त्यातील 221 अहवाल निगेटीव्ह तर 46 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. 19 जणांना डिस्चार्ज
देण्यात आले असल्याचे जिल्हा रुग्णालय व शासकीय
वैद्यकीय महाविद्यालयामार्फत कळविण्यात आले आहे.
त्याच प्रमाणे काल (दि.6)
रॅपिड ॲटीजेन टेस्ट मध्ये आठ जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला. त्यामुळे आता अकोला जिल्ह्यात एकूण पॉझिटीव्ह अहवालांची एकूण संख्या 11838(9590+2071+177) झाली आहे, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय
व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार, आजपर्यंत एकूण 86418 नमुने तपासण्यात आले.
त्यात प्राथमिक तपासणीचे 84609 फेरतपासणीचे 346 तर वैद्यकीय
कर्मचाऱ्यांचे 1463 नमुने होते. आजपर्यंत एकूण 86257 अहवाल प्राप्त झाले आहेत. एकूण निगेटीव्ह अहवालांची संख्या 76667 आहे, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली
आहे.
46
पॉझिटीव्ह
आज दिवसभरात 46 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. आज सकाळी
46 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यात 20 महिला व 26 पुरुषांचा समावेश आहे.
त्यातील मोठी उमरी येथील चार, डाबकी रोड, मलकापूर व मूर्तिजापूर येथील प्रत्येकी तीन, जवाहर नगर, शास्त्री नगर, रणपिसे नगर, डोंगरगाव
व बाळापूर येथील प्रत्येकी दोन, तर उर्वरित बाभूळगाव, खडकी, कौलखेड, गणेश नगर,
आनंद नगर, खोलेश्वर, दुर्गा
चौक, तेलिवेताळ ता. पातूर, जठारपेठ,
विवेकानंद कॉलनी, गोरक्षण रोड, कव्हर नगर, गजानन पेठ, तापडीया
नगर, न्यू भागवत प्लॉट, खेडकर नगर,
घोडेगाव ता. तेल्हारा, उगवा, आदर्श कॉलनी, चांदुर, अकोट
फाईल, बार्शीटाकली व बोरगाव मंजू येथील प्रत्येकी एक प्रमाणे
रहिवासी आहे. तसेच आज सायंकाळी कोणाचाही अहवाल पॉझिटीव्ह आला
नाही.
दरम्यान काल रात्री (दि.6) रॅपिड ॲन्टीजेन टेस्टच्या अहवालात आठ जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला.
त्यांचाही समावेश आजच्या पॉझिटीव्ह अहवाल संख्येत व ॲक्टीव्ह पॉझिटीव्ह अहवाल
संख्येत करण्यात आला आहे, याची
नोंद घ्यावी.
19 जणांना डिस्चार्ज
दरम्यान आज दुपारनंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथून दोन, आयकॉन हॉस्पीटल येथून दोन,
बिहाडे हॉस्पीटल येथून आठ, हॉटेल रिजेंसी
येथून चार, हॉटेल स्कायलार्क येथून दोन तसेच होम आयसोलेशनचा
कालावधी पूर्ण झालेले एक अशा एकूण 19 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे, अशी
माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालयातून देण्यात आली आहे.
808 जणांवर उपचार सुरु
आजपर्यंत एकूण
पॉझिटीव्ह अहवालांची संख्या 11838(9590+2071+177)आहे. त्यातील
338 जण मयत आहेत. डिस्चार्ज दिलेल्या एकूण व्यक्तींची 10692 संख्या आहे.
तर सद्यस्थितीत 808 पॉझिटीव्ह रुग्ण उपचार घेत आहेत, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयाच्या
सूत्रांनी दिली आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा