183 अहवाल प्राप्त, 76 पॉझिटीव्ह, 50 डिस्चार्ज, एक मयत


अकोला,दि.15 (जिमाका)-आज दिवसभरात  शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रयोगशाळेतून (सायंकाळी पाच वाजेपर्यंत) कोरोना संसर्ग तपासणीचे 183 अहवाल प्राप्त झाले. त्यातील 107 अहवाल निगेटीव्ह तर 76 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह  आले. तर एकाचा मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे. दरम्यान 50 जणांना  डिस्चार्ज देण्यात आले असल्याचे जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामार्फत कळविण्यात आले आहे.

त्याच प्रमाणे काल (दि.14) रॅपिड ॲटीजेन टेस्ट मध्ये 10 जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला.  त्यामुळे  आता अकोला जिल्ह्यात एकूण पॉझिटीव्ह अहवालांची एकूण  संख्या  12481(10152+2152+177) झाली आहे, अशी  माहिती शासकीय वैद्यकीय  महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे.

            शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार, आजपर्यंत एकूण 89000 नमुने तपासण्यात आले. त्यात प्राथमिक तपासणीचे 87034 फेरतपासणीचे 358 तर वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे 1608 नमुने होते. आजपर्यंत एकूण 88940 अहवाल प्राप्त झाले आहेत. एकूण निगेटीव्ह अहवालांची संख्या 78788      आहे, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे. 

76 पॉझिटीव्ह

आज दिवसभरात 76  जणांचे अहवाल प्राप्त झाले. आज सकाळी 76 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यात 32 महिला व 44 पुरुषांचा समावेश आहे. त्यातील गोरक्षण रोड येथील पाच, चिंतामणी नगर, स्टेशन रोड, अकोट फैल व जीएससी येथील चार, डाबकी रोड, आळशी प्लॉट, जीएससी बॉय हॉस्टेल, मोठी उमरी, तापडीया नगर व जवाहर नगर येथील प्रत्येकी तीन, केशव नगर, गीता नगर, तापडीया नगर, रवी नगर, संतोष नगर व जठारपेठ येथील प्रत्येकी दोन, तर उर्वरित पातूर, अकोट, पाटी, रवीनगर, कोठारी वाटीका, कपील नगर,खडकी, गायत्री नगर, राजपूत पुरा, रिध्दी सिध्दी, रणपिसे नगर, शंकर नगर, जीएससी, लहान उमरी, कौलखेड, हिंगज, जठारपेठ, निंबा ता.मुर्तिजापूर, डोंगरगाव, मुर्तिजापूर, तुकाराम चौक, तेलीपुरा, सिंधी कॅम्प, राधे नगर व जूने शहर येथील प्रत्येकी एक याप्रमाणे रहिवासी आहे. तसेच आज सायंकाळी  कोणाचाही अहवाल पॉझिटीव्ह आला नाही.

दरम्यान काल रात्री (दि.14) रॅपिड ॲन्टीजेन  टेस्टच्या अहवालात 10 जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला. त्यांचाही समावेश आजच्या पॉझिटीव्ह अहवाल संख्येत व ॲक्टीव्ह पॉझिटीव्ह अहवाल संख्येत करण्यात आला आहे, याची नोंद घ्यावी.

50 जणांना डिस्चार्ज

दरम्यान आज दुपारनंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून 11, आयकॉन हॉस्पीटल येथून पाच, ओझोन हॉस्पीटल येथून दोन, हॉटेल स्कायलार्क येथून तीन, बिहाडे हॉस्पीटल येथून तीन, अवघाते हॉस्पीटल येथून एक, सुर्यचंद्र हॉस्पीटल येथून दोन तर होम आयसोलेशन येथून 23 असे एकूण 50 जणांना डिस्चार्ज देण्यात आला, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालयातून देण्यात आली आहे.

एकाचा मृत्यू

दरम्यान आज दुपारनंतर हिवरखेड ता. अकोट येथील रहिवासी असलेल्या 81  वर्षीय पुरुष रुग्णाचा मृत्यू झाला. या रुग्णास दि. 8 रोजी दाखल करण्यात आले होते, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालयातून देण्यात आली आहे.

947 जणांवर उपचार सुरु

आजपर्यंत एकूण पॉझिटीव्ह अहवालांची संख्या 12481(10152+2152+177) आहे. त्यातील 344 जण मयत आहेत. डिस्चार्ज दिलेल्या एकूण व्यक्तींची  संख्या 11190 आहे. तर सद्यस्थितीत 947 पॉझिटीव्ह रुग्ण उपचार घेत आहेत, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयाच्या सूत्रांनी दिली आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

विधानसभा निवडणूक 2024 - पूर्वपिठीका

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अल्पसंख्याक हक्क दिवस साजरा अल्पसंख्याकांनी आपल्या हक्क व अधिकारांबाबत जागरूक राहा -राजेश खवले