मधमाशापालनासाठी ‘मध केंद्र’ योजना; इच्छुकांना सहभागाचे आवाहन

 अकोला,दि.८(जिमाका)- शासनाच्या  उद्योग उर्जा व कामगार विभागांतर्गत महाराष्ट्र राज्य खादी ग ग्रामोद्योग मंडळामार्फत  मधकेंद्र योजना ही मधमाशापालनासाठी संपूर्ण राज्यात कार्यान्वित झाली आहे. या योजनेत सहभाग घेऊन मधमाशापालन हा व्यवसाय करु इच्छिणाऱ्या इच्छुक  पात्र व्यक्ती व संस्थांकडून  अर्ज मागविण्यात आले आहेत, असे जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी अकोला यांनी कळविले आहे.

योजनेची वैशिष्ट्ये-  मध उद्योगाचे मोप्झत प्रशिक्षण, साहित्य स्वरुपात ५० टक्के अनुदान व ५० टक्के स्वगुंतवणूक, शासनाच्या हमी भावाने  मध खरेदी, विशेष छंद प्रशिक्षणाची सुविधा, मधमाशा संरक्षक व संवर्धनाबाबत जनजागृती.

योजनेतील प्रमुख घटक आणि पात्रता-

१)     वैयक्तिक मधपाळ- अर्जदार हा साक्षर असावा. स्वतःची शेती असल्यास प्राधान्य, वय १८ वर्षांपेक्षा अधिक.

२)     केंद्रचालक प्रगतिशील मधपाळ- किमान १० वी पास, वय २१ वर्षांपेक्षा जास्त, उमेदवाराच्या वा त्याच्या कुटुंबियांच्या नावे किमान एक एकर शेती  किंवा भाडेतत्त्वावरील शेतजमीन असावी. मधमाशा पालन, प्रजनन व मध उत्पादनाच्या प्रशिक्षणाची पूर्ण सुविधा असावी.

३)     केंद्रचालक (संस्था)- संस्था नोंदणीकृत असावी, संस्थेच्या नावे अथवा भाडे तत्वावर घेतलेली किमान एक हजार चौ फुट सुयोग्य इमारत असावी. संस्थेकडे मधमाशा पालन, प्रजनन व मध उत्पादनाच्या प्रशिक्षणाची पूर्ण सुविधा असावी.

४)   केंद्रचालकास ५० मधपेट्या ४२०० रुपये याप्रमाणे ५० टक्के अनुदानावर घेण्यासाठी  जमा करावी लागेल.

अटी व शर्ती- लाभार्थी  निवड प्रक्रियेनंतर  प्रशिक्षणापूर्वी मध व्यवसाय सुरु करण्याबाबत बोधपत्र लिहून द्यावे लागेल तसेच मंडळाने निश्चित केलेल्या ठिकाणी प्रशिक्षण घेणे अनिवार्य राहिल.

अधिक माहितीसाठी –

१)     जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी, महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ द्वारा जिल्हा उद्योग केंद्र, जुना कॉटन मार्केट, अकोला. दुरध्वनी-०७२४-२४३०२५०.

२)     संचालक, मध संचालनालय, महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ, द्वारा शासकीय बंगला नं.५, मु.पो. ता. महाबळेश्वर, जि. सातारास-४१२८०६. दुरध्वनी ०२१६८-२६०२६४.

तरी इच्छुक व्यक्ती व संस्थांनी अर्ज करावा,असे आवाहन जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी, अकोला यांनी केले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्‌मय पुरस्कार प्रवेशिका व पुस्तके पाठविण्याचा कालावधी १ जानेवारी ते ३० जानेवारी २०२६

आदर्श आचारसंहिता निवडणूक आचार संहिता म्हणजे काय ?

महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळ अनुसूचित जातींसाठी विविध कर्ज योजना