कौलखेड येथील जागेबाबत शासकीय कार्यालयांकडून प्रस्ताव मागविले

 अकोला,दि.१८ (जिमाका)- ज्या शासकीय विभाग/ कार्यालयांना मौजे कौलखेडा ता. जि. अकोला  येथील सर्वे नं.१२/१ मध्ये   जागेची आवश्यकता असेल त्यांनी सात दिवसांच्या आत उपजिल्हाधिकारी महसूल यांच्याकडे प्रस्ताव पाठवावा,असे निर्देश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी दिले आहे.

 यासंदर्भात महसूल विभागाकडून प्राप्त माहितीनुसार, शासकीय कार्यालयांसाठी मौजे कौलखेडा ता. जि. अकोला  येथील सर्वे नं.१२/१ मध्ये  एक हेक्टर ४१.८८ आर एवढी जमीन आरक्षित केली आहे.  आरक्षण क्रमांक ९४- शासकीय कार्यालय असे या आरक्षणाबाबत नमूदही केले आहे. ही जमीन खाजगी मालकाची असून  भुसंपादन करुन संबंधित यंत्रणांना उपलब्ध करुन द्यावी लागणार आहे. या संदर्भात  जागा मालकाने उच्च न्यायालयात याचिकाही दाखल केली आहे. त्यानुसार  भुसंपादनाबाबत माहितीही उच्च न्यायालयात सादर करावयाची आहे.  तथापि, ज्या शासकीय विभाग/ कार्यालयांना सर्वे नं.१२/१ मध्ये जमिनीची आवश्यकता असेल त्यांनी तातडीने सात दिवसांच्या आत  उपजिल्हाधिकारी महसूल , जिल्हाधिकारी कार्यालय, अकोला येथे  जागा मागणीचा रितसर प्रस्ताव  सादर करावा. तसा प्रस्ताव न आल्यास  जागेची आवश्यकता नाही असे गृहित धरुन पुढील कार्यवाही करण्यात येईल,असे जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी कळविले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

विधानसभा निवडणूक 2024 - पूर्वपिठीका

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अल्पसंख्याक हक्क दिवस साजरा अल्पसंख्याकांनी आपल्या हक्क व अधिकारांबाबत जागरूक राहा -राजेश खवले