रॅपिड ॲन्टीजेन टेस्टः १०६ चाचण्यात १३ पॉझिटीव्ह
अकोला,दि.९(जिमाका)- कोरोना संसर्ग चाचणीसाठी जिल्ह्यात रॅपिड ॲन्टीजन टेस्ट राबविण्यात येत आहे. यात आज दिवसभरात झालेल्या १०६ चाचण्या झाल्या त्यात १३ जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे यांनी दिली.
आज दिवसभरात बाळापूर येथे तीन, बार्शीटाकळी येथे दोन,
तेल्हारा येथे चार, मुर्तिजापुर येथे तीन
आयएमए अकोला येथे सात , आरोग्य कर्मचाऱ्यांच्या १६ चाचण्या झाल्या त्यात
कुणाचाही अहवाल पॉझिटिव्ह आला नाही. तर अकोट येथे २५ जणांच्या चाचण्या झाल्या
त्यात सहा जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात ३९ चाचण्या झाल्या त्यात चार जणांचे अहवाल
पॉझिटीव्ह आले. हेडगेवार लॅब येथे सात जणांच्या चाचण्या होऊन तीन जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. असे एकूण १०६ चाचण्यांमधून १३ जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला. आतापर्यंत जिल्ह्यात ३२ हजार ५७२ चाचण्या
झाल्या पैकी २१४९ जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा