82 अहवाल प्राप्त, 12 पॉझिटीव्ह, 22 डिस्चार्ज
अकोला,दि.8(जिमाका)-आज दिवसभरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रयोगशाळेतून (सायंकाळी पाच वाजेपर्यंत) कोरोना संसर्ग तपासणीचे 82 अहवाल प्राप्त झाले. त्यातील 70 अहवाल निगेटीव्ह तर 12 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. दरम्यान 22 जणांना डिस्चार्ज देण्यात आले असल्याचे जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामार्फत कळविण्यात आले आहे.
त्याच प्रमाणे काल (दि.7) रॅपिड ॲटीजेन टेस्ट
मध्ये चार जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला. त्यामुळे आता अकोला जिल्ह्यात एकूण पॉझिटीव्ह अहवालांची एकूण संख्या 11854(9602+2075+177) झाली आहे, अशी माहिती शासकीय
वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा
रुग्णालय सूत्रांनी दिली आहे.
शासकीय
वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार, आजपर्यंत एकूण 86486 नमुने तपासण्यात आले. त्यात प्राथमिक
तपासणीचे 84675 फेरतपासणीचे 346 तर वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे 1465 नमुने होते. आजपर्यंत एकूण 86339 अहवाल प्राप्त झाले आहेत. एकूण
निगेटीव्ह अहवालांची संख्या 76737 आहे, अशी माहिती
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे.
12 पॉझिटीव्ह
आज सकाळी 12 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यात एक महिला व 11
पुरुषांचा समावेश आहे. त्यातील दुर्गा चौक, गोरक्षण रोड, कव्हर नगर, न्यू तापडीया नगर, अडगाव
हिवरखेड ता. तेल्हारा, डाबकी रोड, जीएमसी
क्वॉटर, रणपिसे नगर, शिवणी, जवाहर नगर, जीएमसी व शिवाजी पार्क येथील प्रत्येकी
एक याप्रमाणे रहिवासी आहे. आज सायंकाळी
कोणाचाही अहवाल पॉझिटीव्ह आला नाही.
दरम्यान काल रात्री (दि.7) रॅपिड ॲन्टीजेन टेस्टच्या अहवालात चार जणांचा अहवाल पॉझिटीव्ह
आला. त्यांचाही समावेश आजच्या पॉझिटीव्ह अहवाल संख्येत व ॲक्टीव्ह पॉझिटीव्ह अहवाल
संख्येत करण्यात आला आहे, याची नोंद घ्यावी..
22 जणांना डिस्चार्ज
दरम्यान आज दुपारनंतर ओझोन हॉस्पीटल येथून एक, बिहाडे
हॉस्पीटल येथून एक, हॉटेल स्कायलार्क येथून एक, सुर्यचंद्र हॉस्पीटल येथून एक, तसेच होम आयसोलेशनचा
कालावधी पूर्ण झालेले 18 अशा एकूण 22 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व
जिल्हा रुग्णालयातून देण्यात आली आहे.
802 जणांवर उपचार सुरु
आजपर्यंत एकूण
पॉझिटीव्ह अहवालांची संख्या 11854(9602+2075+177)आहे. त्यातील 338 जण मयत आहेत. डिस्चार्ज दिलेल्या एकूण
व्यक्तींची 10714 संख्या आहे. तर सद्यस्थितीत 802
पॉझिटीव्ह रुग्ण उपचार घेत आहेत, अशी माहिती
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयाच्या सूत्रांनी दिली
आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा