जिल्ह्यातील कोरोना संक्रमणाच्या सद्यस्थितीबाबत पालकसचिव सौरभ विजय यांनी दूरदृष्य प्रणालीद्वारे घेतला आढावा

 





अकोला,दि.16 (जिमाका)- जिल्ह्यात कोरोना संक्रमाची व्याप्ति वाढत आहे. या संदर्भात प्रशासन सतर्क असून विविध उपाययोजना राबविण्यात येत आहेत. त्याच अनुषंगाने दूरदृष्य प्रणालीद्वारे आज पालकसचिव सौरभ विजय यांनी आढावा घेतला.

यावेळी जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, मनपा आयुक्त निमा अरोरा, मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ कटियार, निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे, जिल्हा आरोग्य अधिकारी सुरेश आसोले, मनपाचे वैद्यकीय अधिकारी फारुख शेख,  पोलीस निरीक्षक मोनिका राऊत तसेच अन्य अधिकारी उपस्थित होते.

यावेळी कोरोना संसर्गाच्या प्रतिबंधात्मक उपाययोजनाबाबत आढावा घेऊन मास्क न वापरण्यावर दंडात्मक कार्यवाही करुन मास्कचा वापर, सामाजिक अंतर व हात धुणे या नियमांचेक्तीने पालन करण्याचे निर्देश दिलेत. कोरोना रुग्णाच्या संपर्कातील व्यक्तीचा शोध घेवून रॅपिड व आरपीटीएस चाचण्याचे प्रमाण वाढवा. तसेच विलगीकरण करण्यात आलेले रुग्ण नियमांचे पालन करीत नसल्यास त्यांना शासकीय रुग्णालयात दाखल करुन त्यांच्यावर उपचार करावे. बाजारात व गर्दीच्या ठिकाणी पोलीस प्रशासनाने कडक कार्यवाही करावी. तसेच कोरोना उपाययोजनाबाबत जनजागृती करण्याचेही सूचना त्यांनी यावेळी दिल्यात.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

विधानसभा निवडणूक 2024 - पूर्वपिठीका

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अल्पसंख्याक हक्क दिवस साजरा अल्पसंख्याकांनी आपल्या हक्क व अधिकारांबाबत जागरूक राहा -राजेश खवले