531 अहवाल प्राप्त, 90 पॉझिटीव्ह, 27 डिस्चार्ज

 


अकोला,दि.12 (जिमाका)-आज दिवसभरात  शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रयोगशाळेतून (सायंकाळी पाच वाजेपर्यंत) कोरोना संसर्ग तपासणीचे 531 अहवाल प्राप्त झाले. त्यातील 441 अहवाल निगेटीव्ह तर 90 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह  आले. दरम्यान 27 जणांना  डिस्चार्ज देण्यात आले असल्याचे जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामार्फत कळविण्यात आले आहे.

त्याच प्रमाणे काल (दि.11) रॅपिड ॲटीजेन टेस्ट मध्ये तीन जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला.  त्यामुळे  आता अकोला जिल्ह्यात एकूण पॉझिटीव्ह अहवालांची एकूण  संख्या  12154(9866+2111+177) झाली आहे, अशी  माहिती शासकीय वैद्यकीय  महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे.

            शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार, आजपर्यंत एकूण 88053 नमुने तपासण्यात आले. त्यात प्राथमिक तपासणीचे 86195 फेरतपासणीचे 354 तर वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे 1504 नमुने होते. आजपर्यंत एकूण 87965 अहवाल प्राप्त झाले आहेत. एकूण निगेटीव्ह अहवालांची संख्या 78099     आहे, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे. 

90 पॉझिटीव्ह

आज दिवसभरात 531 जणांचे अहवाल प्राप्त झाले. आज सकाळी 87 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यात 24 महिला व 63 पुरुषांचा समावेश आहे. त्यातील  मुर्तिजापूर येथील 15, जीएमसी येथील 13, तापडीया नगर येथील सहा, जठारपेठ येथील पाच, डाबकी रोड व गोडबोले प्लॉट येथील प्रत्येकी चार, बाळापूर येथील तीन, गोरक्षण रोड, राम नगर, न्यु तापडीया नगर,  बोरगाव मंजू, रणपिसे नगर व न्यायधीस वसाहत येथील प्रत्येकी दोन, तर उर्वरित अकोट, हिवरखेड ता. तेल्हारा, राधाकिसन प्लॉट, रेल्वे स्टेशन, नागपूर रोड, सिंधी कॅम्प, गुडधी, माळीपुरा, गवलीपुरा, सहकार नगर, कारंजा ता.बाळापूर, दत्त कॉलनी, मिल कॉलनी, केशव नगर, जैन चौक, न्यु तारफैल, वाशिंबा, मलकापूर, म्हैसांग, कौलखेड, गणेश नगर, प्राजंली  नगर, मोठी उमरी, दक्षता रोड व जीएमसी हॉस्टेल येथील प्रत्येकी एक याप्रमाणे रहिवासी आहे. तसेच आज सायंकाळी तीन जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला. त्यात दोन महिला व एक पुरुषाचा समावेश असून ते विमल नगर मलकापूर येथील दोन तर जीएमसी येथील एक याप्रमाणे रहिवासी आहे.

दरम्यान काल रात्री (दि.11) रॅपिड ॲन्टीजेन  टेस्टच्या अहवालात तीन जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला. त्यांचाही समावेश आजच्या पॉझिटीव्ह अहवाल संख्येत व ॲक्टीव्ह पॉझिटीव्ह अहवाल संख्येत करण्यात आला आहे, याची नोंद घ्यावी.

27 जणांना डिस्चार्ज

दरम्यान आज दुपारनंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून सहा, आयकॉन हॉस्पीटल येथून दोन, बिहाडे हॉस्पीटल येथून तीन, सुर्यचंद्र हॉस्पीटल येथून एक तर होम आयसोलेशन येथून 15 असे एकूण 27 जणांना डिस्चार्ज देण्यात आला, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालयातून देण्यात आली आहे.

746 जणांवर उपचार सुरु

आजपर्यंत एकूण पॉझिटीव्ह अहवालांची संख्या 12154(9866+2111+177) आहे. त्यातील 342 जण मयत आहेत. डिस्चार्ज दिलेल्या एकूण व्यक्तींची  संख्या 11066 आहे. तर सद्यस्थितीत 746 पॉझिटीव्ह रुग्ण उपचार घेत आहेत, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयाच्या सूत्रांनी दिली आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ