कौशल्य विभागातर्फे उद्या (दि.26) पासून ऑनलाईन रोजगार मेळावे

 


 

                        अकोला,दि.24(जिमाका)- जिल्‍हा कौशल्‍य कार्यालयामार्फत पंडीत दीनदयाल उपाध्‍याय ऑनलाइन रोजगार मेळाव्‍याचे आयोजन शुक्रवार दि. 26 ते रविवार दि. 28 दरम्यान करण्यात आले आहे.

                        या मेळाव्‍यात नामवंत कंपनीतील विविध पदाकरीता ऑनलाईन भरती प्रक्रीया राबविली जाईल. दहावी, बारावी, पदवीधर आय.टी.आय. उर्तिण शैक्षणिक पात्रता धारक उमेदवारांना संधी उपलब्‍ध असेल. या ऑनलाईन मेळाव्‍यात इच्छुक युवक, युवतींनी  मेळाव्‍यातील रिक्‍त पदांची अधिक माहिती करीता कौशल्‍य विकास, रोजगार व उद्योजकता विभागाच्‍या www.rojgar.mahaswayam.gov.in  या वेबसाईट वर भेट दयावी. तर मेळाव्‍यात सहभागी होण्‍याकरीता (Apply) कौशल्‍य विकास, रोजगार व उद्योजकता विभागाच्‍या www.rojgar.mahaswayam.gov.in  या पोर्टलवर  आपला प्राप्‍त सेवायोजन कार्ड      (Employment Card ) चा आयडी व पासवर्डचा वापर करुन आपल्‍या लॉग इन मधुन सहभाग (Apply)  नोंदवावा. ज्‍या उमेदवारांनी अद्याप कौशल्‍य विकास, रोजगार व उद्योजकता विभागाच्‍या www.rojgar.mahaswayam.gov.in  या पोर्टलवर  नोंदणी केलेली नाही, त्‍यांनी प्रथम नोंदणी करुन प्राप्‍त युंझर आयडी व पासवर्डच्‍या आधारे रोजगार मेळाव्‍यात सहभाग (Apply)  नोंदवावा, असे आवाहन जिल्‍हा कौशल्‍य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्‍त प्रांजली यो. बारस्‍कर यांनी केले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ