508 अहवाल प्राप्त, 112 पॉझिटीव्ह, 26 डिस्चार्ज

 


अकोला,दि.13 (जिमाका)-आज दिवसभरात  शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रयोगशाळेतून (सायंकाळी पाच वाजेपर्यंत) कोरोना संसर्ग तपासणीचे 508 अहवाल प्राप्त झाले. त्यातील 396 अहवाल निगेटीव्ह तर 112 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह  आले. दरम्यान 26 जणांना  डिस्चार्ज देण्यात आले असल्याचे जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामार्फत कळविण्यात आले आहे.

त्याच प्रमाणे काल (दि.12) रॅपिड ॲटीजेन टेस्ट मध्ये 16 जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला.  त्यामुळे  आता अकोला जिल्ह्यात एकूण पॉझिटीव्ह अहवालांची एकूण  संख्या  12282(9978+2127+177) झाली आहे, अशी  माहिती शासकीय वैद्यकीय  महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे.

            शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार, आजपर्यंत एकूण 88723 नमुने तपासण्यात आले. त्यात प्राथमिक तपासणीचे 86859 फेरतपासणीचे 355 तर वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे 1509 नमुने होते. आजपर्यंत एकूण 88473 अहवाल प्राप्त झाले आहेत. एकूण निगेटीव्ह अहवालांची संख्या 78495      आहे, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे. 

112 पॉझिटीव्ह

आज दिवसभरात 508 जणांचे अहवाल प्राप्त झाले. आज सकाळी 105 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यात 40 महिला व 65 पुरुषांचा समावेश आहे. त्यातील  अकोट येथील 24, मुर्तीजापूर येथील 13, मोठी उमरी येथील सहा, कौलखेड येथील चार, गोरक्षण रोड,आळसी प्लॉट, जीएमसी, सिंधी कॅम्प व केशव नगर येथील प्रत्येकी तीन, न्यु खेतान नगर, तोष्णीवाल लेआऊट, तेलीपुरा, राम नगर, तापडीया नगर, साईनाथ कॉलनी व चिरानीया हॉस्पीटल येथील प्रत्येकी दोन, तर उर्वरित वानखडे नगर, रणपिसे नगर, जीएमसी हॉस्टेल, जीएसी क्वॉटर, राऊतवाडी, पातूर, रेल्वे कॉलनी, सिंधी कॉलनी, न्यु राधाकिसन प्लॉट, अकोट फैल, मनपा हिंदी शाळा, मुझफ्फर नगर, विद्यानगर, रतनलाल प्लॉट, सिव्हील लाईन,सावरा ता.अकोट, बाळापूर, गायगाव, गीता नगर, रणपिसे नगर, माला कॉलनी, डाबकी रोड, संतोष नगर, देशमुख फैल, जवाहर नगर, लहान उमरी, गंगा नगर, र्किती नगर, शिवनगर येथील प्रत्येकी एक याप्रमाणे रहिवासी आहे.  तसेच आज सायंकाळी सात जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला. त्यात दोन महिला व पाच पुरुषाचा समावेश आहे. त्यात  धाबा ता. बार्शीटाकळी येथील दोन, तर उर्वरित हाता ता. बाळापूर, साईनाथ कॉलनी, वाडी ता.तेल्हारा, मुर्तीजापूर व बस स्टँण्ड मागे येथील प्रत्येकी एक याप्रमाणे रहिवासी आहे.

दरम्यान काल रात्री (दि.12) रॅपिड ॲन्टीजेन  टेस्टच्या अहवालात 16 जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला. त्यांचाही समावेश आजच्या पॉझिटीव्ह अहवाल संख्येत व ॲक्टीव्ह पॉझिटीव्ह अहवाल संख्येत करण्यात आला आहे, याची नोंद घ्यावी.

26 जणांना डिस्चार्ज

दरम्यान आज दुपारनंतर आयकॉन हॉस्पीटल येथून तीन, ओझोन हॉस्पीटल येथून दोन, हॉटेल स्कायलार्क येथून एक, बिहाडे हॉस्पीटल येथून चार, अवघाते हॉस्पीटल येथून एक, सुर्यचंद्र हॉस्पीटल येथून तीन तर होम आयसोलेशन येथून 12 असे एकूण 26 जणांना डिस्चार्ज देण्यात आला, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालयातून देण्यात आली आहे.

848 जणांवर उपचार सुरु

आजपर्यंत एकूण पॉझिटीव्ह अहवालांची संख्या 12282(9978+2127+177) आहे. त्यातील 342 जण मयत आहेत. डिस्चार्ज दिलेल्या एकूण व्यक्तींची  संख्या 11092 आहे. तर सद्यस्थितीत 848 पॉझिटीव्ह रुग्ण उपचार घेत आहेत, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयाच्या सूत्रांनी दिली आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ