३१७ अहवाल प्राप्त, ५९ पॉझिटीव्ह, तिघांचा मृत्यू, ९५ डिस्चार्ज

 अकोला,दि.९ (जिमाका)-आज दिवसभरात  शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रयोगशाळेतून (सायंकाळी पाच वाजेपर्यंत) कोरोना संसर्ग तपासणीचे ३१७ अहवाल प्राप्त झाले. त्यातील २५८ अहवाल निगेटीव्ह तर ५९ जणांचे अहवाल पॉझिटीव्ह  आले. आज तीन रुग्णांचा मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे.  दरम्यान ९५ जणांना  डिस्चार्ज देण्यात आले असल्याचे जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामार्फत कळविण्यात आले आहे.

त्याच प्रमाणे काल (दि.८) रॅपिड ॲटीजेन टेस्ट मध्ये आठ जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला.  त्यामुळे  आता अकोला जिल्ह्यात एकूण पॉझिटीव्ह अहवालांची एकूण  संख्या ११९२१(९६६१+२०८३+१७७) झाली आहे, अशी  माहिती शासकीय वैद्यकीय  महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे.

            शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार, आजपर्यंत एकूण ८६७०३  नमुने तपासण्यात आले. त्यात प्राथमिक तपासणीचे ८४८८७ फेरतपासणीचे ३४८ तर वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे १४६८ नमुने होते. आजपर्यंत एकूण ८६६५६ अहवाल प्राप्त झाले आहेत. एकूण निगेटीव्ह अहवालांची संख्या ७६९९५  आहे, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे. 

५९ पॉझिटीव्ह

आज दिवसभरात ३१७ जणांचे अहवाल प्राप्त झाले. त्यात ५९ जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यात २३ महिला व ३६ पुरुष रुग्ण आहेत.  त्यात मुर्तिजापूर आणि अकोट येथील प्रत्येकी आठ, डाबकी रोड, मोठी उमरी, तोष्णीवाल ले आऊट येथील प्रत्येकी चार, बाभुळगाव, रतनलाल प्लॉट येथील प्रत्येकी तीन,  सहकार नगर, केडीया प्लॉट, हिवरखेड येथील प्रत्येकी दोन तर उर्वरीत राऊतवाडी, बार्शी टाकळी, कलाल ची चाळ, गुडधी, तापडीया नगर,  गोडबोले प्लॉट, न्यु तापडीया नगर, पातूर, जुने शहर, कैलास टेकडी, न्यु भागवत प्लॉट,  जवाहर नगर,  गंगानगर, सिव्हील लाईन, गीता नगर, बोरगाव मंजू, जीएमसी, निंबोरा, ओम सोसायटी येथील प्रत्येकी  एक या प्रमाणे रहिवासी आहेत. आज सायंकाळी कोणाचाही अहवाल पॉझिटीव्ह आला नाही.

दरम्यान काल रात्री (दि.८) रॅपिड ॲन्टीजेन  टेस्टच्या अहवालात आठ जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला. त्यांचाही समावेश आजच्या पॉझिटीव्ह अहवाल संख्येत व ॲक्टीव्ह पॉझिटीव्ह अहवाल संख्येत करण्यात आला आहे, याची नोंद घ्यावी.

तिघांचा मृत्यू

दरम्यान आज तीन रुग्णांचा उपचार घेतांना मृत्यू झाला.  त्यात कापशी येथील एका ६७ वर्षीय महिला रुग्णाचा समावेश आहे. या महिलेस  दि.१ रोजी दाखल करण्यात आले होते. तर अन्य एक सुकळी ता. बार्शी टाकळी येथील  ६५ वर्षीय पुरुषाचा समावेश आहे. या रुग्णास दि.६ रोजी दाखल करण्यात आले होते. त्यांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला.  तर एका खाजगी रुग्णालयात ६० वर्षीय पुरुष रुग्णाचा मृत्यू झाला. हा रुग्ण केशव नगर, अकोला येथील रहिवासी आहे. त्यांना दि. १ रोजी दाखल करण्यात आले होते, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालयातून देण्यात आली.

 

९५ जणांना डिस्चार्ज

दरम्यान आज दुपारनंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथून दोन, आयकॉन हॉस्पीटल येथून दोन, बिहाडे हॉस्पीटल येथून तीन, सुर्याचंद्र हॉस्पीटल येथून एक, तसेच होम आयसोलेशनचा कालावधी पूर्ण झालेले ८७ अशा एकूण ९५ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालयातून देण्यात आली आहे.

७७१ जणांवर उपचार सुरु

आजपर्यंत एकूण पॉझिटीव्ह अहवालांची संख्या ११९२१(९६६१+२०८३+१७७) आहे. त्यातील ३४१ जण मयत आहेत. डिस्चार्ज दिलेल्या एकूण व्यक्तींची  संख्या  १०८०९आहे. तर सद्यस्थितीत ७७१ पॉझिटीव्ह रुग्ण उपचार घेत आहेत, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयाच्या सूत्रांनी दिली आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्‌मय पुरस्कार प्रवेशिका व पुस्तके पाठविण्याचा कालावधी १ जानेवारी ते ३० जानेवारी २०२६

आदर्श आचारसंहिता निवडणूक आचार संहिता म्हणजे काय ?

महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळ अनुसूचित जातींसाठी विविध कर्ज योजना