सहकारी संस्थाबाबतचे हरकत, आक्षेप संबंधीत अवसायकाकडे नोंदवावे
अकोला,दि.४ (जिमाका)- सहकारी संस्थांचे अवसायक असुन सहाय्यक निबंधक सहकारी संस्था,पातूर यांच्या आदेशानुसार संस्थांच्या अंतीम अवसायनाचे कामकाज पूर्ण
करण्याबाबत सूचीत केले आहे. त्यामुळे वरील संस्थांचे सभासद, भागधारक,
अथवा
सभासदांचे वारस असल्यास त्यांचे संस्थेकडे काही घेणे असल्यास अथवा कोणत्या सभासद, भागधारक अथवा सभासदांचे वारसा कडुन काही घेणे असल्यास
त्याबाबतच्या आक्षेप व
हरकती संबंधीत अवसायकाकडे सहाय्यक निबंधक सहकारी
संस्था, टि.के.व्ही. चौक, पातूर येथे सात
दिवसामध्ये संपर्क करुन सादर करावे.
सभासद,भागधारक अथवा सभासदांचे वारसा यांचे कडुन दिलेल्या मुदतीत
हरकत किवा आक्षेप म्हणने प्रत्यक्ष
अवसायकाकडे सादर न केल्यास संस्थांचे सभासद, भागधारक अथवा सभासदांचे वारस असलेल्यांचे कोणाचेही, काहिहि म्हणने नाही असे समजून संस्थेची नोंदणी रद्द करण्यात येईल यांची नोंद घ्यावी,
असे सहकारी संस्था पातूरचे सहाय्यक निबंधक व्ही एम बोराळे यांनी कळविले आहे.
अवसायकातील संस्था
(1) मानपुरी ग्रामीण बिगरशेती सहकारी पत संस्था.म.अंबाशी र.नं.
1405 (2) शेतकरी सहकारी खरेदी विक्री
कर्मचारी पत संस्था म.पातूर र.नं.1369 (3) सार्थक मागासवर्गीय औद्योगीक सहकारी सं.म.तांदळी र.नं.
122 (4) डाँ.बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय गारमेंट सहकारी संस्था मर्या.,चान्नी र.नं.1404 (5) चक्रधर गृहनिर्माण सहकारी संस्था मर्या.,आलेगांव र.नं.1410 (6) कौसल्याबाई गृहतारण सहकारी
संस्था मर्या.,अंबाशी र.नं.1403 (7) निगृर्णा गृहनिर्माण सहकारी संस्था मर्या.,चरणगांव र.नं.1405 (8) वंदना प्लॅाट ओनर्स सहकारी
संस्था मर्या.,पातूर र.नं.1412
(9) मुंगसाजी आदिवासी गृहनिर्माण सहकारी संस्था.,चोंढी र.नं.1411 (10) शहाबाबु गृहनिर्माण सहकारी
संस्था मर्या.,पातूर र.नं.1413
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा