रॅपिड ॲन्टीजेन टेस्टः 85 चाचण्यात 15 पॉझिटीव्ह
अकोला,दि. 13(जिमाका)- कोरोना संसर्ग चाचणीसाठी जिल्ह्यात रॅपिड ॲन्टीजन टेस्ट राबविण्यात येत आहे. यात आज दिवसभरात झालेल्या 85 चाचण्या झाल्या त्यात 15 जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे यांनी दिली.
आज दिवसभरात बाळापूर येथे दोन, बार्शीटाकळी येथे दोन, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या नऊ चाचण्या झाल्या त्यात
कुणाचाही अहवाल पॉझिटिव्ह आला नाही. तर अकोट येथे 34 जणांच्या चाचण्या झाल्या त्यात 10 जणांचे अहवाल
पॉझिटिव्ह आले, आयएमए अकोला येथे 10
जणांच्या चाचण्या झाल्या त्यात एकाचा अहवाल पॉझिटिव्ह आला, शासकीय वैद्यकीया
महाविद्यालयातून येथे 24
चाचण्या झाल्या त्यात तीन जणांचे अहवाल
पॉझिटिव्ह आले, हेगडेवार लॅब येथे चार चाचण्या झाल्या त्यात एकाचा
अहवाल पॉझिटिव्ह आला, असे
एकूण 85 चाचण्यांमधून 15 जणांचा अहवाल पॉझिटीव्ह
आला. आतापर्यंत जिल्ह्यात 32 हजार 961 चाचण्या झाल्या पैकी 2195
जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा