1397 अहवाल प्राप्त, 279 पॉझिटिव्ह, 60 डिस्चार्ज, तिघांचा मृत्यू
अकोला,दि.25(जिमाका)- आज दिवसभरात शासकीय वैद्यकीय
महाविद्यालयातील प्रयोगशाळेतून (सायंकाळी पाच वाजेपर्यंत) कोरोना संसर्ग तपासणीचे 1397 अहवाल
प्राप्त झाले. त्यातील 1118 अहवाल निगेटीव्ह तर 279 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. दरम्यान 60 जणांना डिस्चार्ज देण्यात आला तर तीन रुग्णांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला, असे जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामार्फत कळविण्यात आले
आहे.
त्याच प्रमाणे काल (दि.24)
रॅपिड ॲटीजेन टेस्ट मध्ये 42 जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला. त्यामुळे आता अकोला
जिल्ह्यात एकूण पॉझिटीव्ह अहवालांची एकूण संख्या 15124(12467+2480+177) झाली आहे, अशी माहिती शासकीय
वैद्यकीय महाविद्यालय व
जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे.
शासकीय
वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार, आजपर्यंत एकूण 98267 नमुने तपासण्यात आले.
त्यात प्राथमिक तपासणीचे 96098 फेरतपासणीचे 373 तर वैद्यकीय
कर्मचाऱ्यांचे 1796 नमुने होते.
आजपर्यंत एकूण 98125 अहवाल प्राप्त झाले आहेत. एकूण निगेटीव्ह अहवालांची
संख्या 85658 आहे, अशी माहिती शासकीय
वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे.
279
पॉझिटिव्ह
आज
सकाळी 167 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यात 63 महिला व 104 पुरुषांचा समावेश आहे. त्यातील
मुर्तिजापूर येथील 13, अकोट येथील 11, कौलखेड
येथील 10, तेल्हारा येथील नऊ, जठारपेठ
येथील आठ, गौरक्षण रोड येथील सात, सिंधी
कॅम्प येथील पाच, जीएमसी, जूने शहर,
जवाहर नगर, तापडीया नगर, मलकापूर व पातूर येथील प्रत्येकी चार, शास्त्री नगर,
डाबकी रोड, भौरद, केतन
नगर व जूने राधाकिसन प्लॉट येथील प्रत्येकी तीन, पोपटखेड,
रामदासपेठ, गीता नगर, मोठी
उमरी, पैलपाडा, लहान उमरी, मलकापूर, खेलदेशपांडे, राऊतवाडी,
खरप व इनकम टॅक्स येथील प्रत्येकी दोन तर उर्वरित गोकूल कॉलनी,
अनिकेत, शिवाजी नगर, खडकी,
तारफैल, महसूल कॉलनी, दिवेकर
चौक, बाळापूर, आळसी प्लॉट, बायपास, वृदावन नगर, जामठी बु.,
लक्ष्मी नगर, निपान, खदान,
देवर्डा, परीवार कॉलनी, गायत्री
नगर, आंबेडकर नगर, किर्ती नगर, शालीनी टॉकीज, पाटील मार्केट, वृंदावन
नगर, आदर्श कॉलनी, व्हीएबी कॉलनी,
सुधीर कॉलनी, गुडधी, पत्रकार
कॉलनी, रतनलाल प्लॉट, पंचायत समिती,
गोडबोले प्लॉट, आनंद नगर, गुलजार पुरा, दिपक चौक, केशव
नगर, शिवाजी नगर, हरिहरपेठ, नरसिंगपूर, उंबरखेड, व्याळा,
हिवरखेड, हिंगणा बु., व
घोडेगाव येथील प्रत्येकी एक याप्रमाणे रहिवासी आहे. तसेच आज सायंकाळी 112 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यात 31 महिला व 81 पुरुषांचा समावेश आहे. त्यात अकोट येथील 35, बोरगाव
मंजू येथील 14, एमआयडीसी येथील आठ, कपिलवास्तू
येथील सहा, सुधीर कॉलनी व सिंधी कॅम्प येथील प्रत्येकी पाच,
वरुद व खडकी येथील प्रत्येकी चार, मलकापूर
येथील तीन, मोठी उमरी, जीएमसी, दोडवाडा, कळंबेश्वर, रजपूतपुरा
व पातूर येथील प्रत्येकी दोन, तर उर्वरित कापशी रोड, देवी खदान, संत नगर, गिता नगर,
देशमुख फैल, कौलखेड, न्यु
तापडीया नगर, शास्त्री नगर, कॉग्रेशनगर,
जज क्वार्टर, समता नगर, जूने
शहर, डाबकी रोड, बाळापूर, आदर्श कॉलनी, हिंगणा रोड येथील प्रत्येकी एक
याप्रमाणे रहिवासी आहे.
दरम्यान काल रात्री रॅपिड ॲन्टीजेन टेस्टच्या अहवालात 42 जणांचा अहवाल
पॉझिटीव्ह आला. त्यांचाही समावेश आजच्या पॉझिटीव्ह अहवाल संख्येत व ॲक्टीव्ह
पॉझिटीव्ह अहवाल संख्येत करण्यात आला आहे, याची कृपया नोंद
घ्यावी. दरम्यान आज दिवसभरात सकाळी आरटिपीसीआरच्या
चाचण्यात 167, सायंकाळी आरटिपीसीआरच्या चाचण्यात 112 तर रॅपिड चाचण्यात 42 असे एकूण 321 जणांचे अहवाल
पॉझिटिव्ह आले.
60 जणांना डिस्चार्ज
दरम्यान
आज दुपारनंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून 13, आयकॉन हॉस्पीटल येथून चार,
ओझोन हॉस्पीटल येथून चार, हॉटेल स्कायलार्क
येथून दोन, सूर्यचंद्र हॉस्पीटल येथून दोन, अवघाते हॉस्पीटल येथून चार, बिहाडे हॉस्पीटल येथून
आठ, हॉटेल रिजेन्सी येथून नऊ, होम
आयसोलेशन येथून 14 असे एकूण 60 जणांना
डिस्चार्ज देण्यात आला, अशी माहिती जिल्हा रुग्णालयातून देण्यात आली.
तिघांचा मृत्यू
दरम्यान आज तिघांचा मृत्यू झाला. त्यात वाशिम बायपास
येथील रहिवासी असलेल्या 86
वर्षीय पुरुष रुग्णाचा मृत्यू झाला. या रुग्णास दि. 24 रोजी दाखल करण्यात आले होते, तर अन्य पातुर येथील 15 वर्षीय महिलाचा मृत्यू झाला. या रुग्णास दि. 23
रोजी दाखल करण्यात आले होते, तर खाजगी हॉस्पीटल येथून एकाचा
मृत्यू झाला असून तो अकोट येथील रहिवासी असलेल्या 78 वर्षीय पुरुष आहे. या रुग्णास दि. 23 रोजी दाखल करण्यात आले होते, अशी माहिती सकीय वैद्यकीय
महाविद्यालयातून देण्यात आली.
2921 जणांवर उपचार सुरु
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा